मराठी पत्र लेखन
पत्र मुख्यतः दोन प्रकारचे आहेत.
१.औपचारिक पत्र -
२. अनौपचारिक पत्र -
२. अनौपचारिक पत्र -
प्र. 1. तूमच्या मित्राला वाढदिवसा निम्मित शुभेच्छा देणारे पत्र लिहा. 05 गुण
उत्तर -
दिनांक : १४ मार्च, २०२१
प्रिय मित्र करण ,
सप्रेम नमस्कार .
अरे माझ्या लाडक्या मित्रा करण तू कसा आहेस ? सर्व मजेत ना ? माझ सर्व ठीक चालल आहे. मी खूप मजेत आहे, परंतु तूझी खूप आठवण येते रे .
येतणा-या १६ एप्रिल ला तुझा वाढ दिवस येतोय त्या शुभ दिनासाठी माझ्या तर्फे तुला खुप खुप शुभेच्छा .माझ्या शुभेच्छा सदैव तुझ्या सोबत आहेत.
तुझ्या साठी भेटवस्तू म्हणुन तुला आवडणारे 'श्यामची आई' हे पुस्तक पाठवत आहे . आशा आहे तुला ते जरूर आवडेल आणि तुझ्या साठी लाभदायी ठरेल.
परत एकदा तूला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा !
तुझाच मित्र,
आशेम पठाण.
सेवाभाव वसतिगृह,
३४६६, कुर्ला बाग,
उमरखेड.
मो. 9400000000.
ई-मेल -ashem678@gmail.com
================================
2. दहावीच्या परीक्षेत यशस्वी झाल्याबद्दल चुलत भावास अभिनंदनाचे पत्र लिहा.
उत्तर -
दि. २० मार्च, २०२१
प्रिय केशव,
सप्रेम नमस्कार.
काल रात्रीच आईकडून समजलं कि तुला दहावीच्या परीक्षेत चांगले गुण मिळाले, हे कळल्यावर मला खूप आनंद झाला. म्हणून तुला हे खास अभिनंदनाचे पत्र लिहित आहे .
तू लहानपणापासूनच खूप हुशार होतास दहावीतही तुला उत्तम गुण मिळतील ह्याची मला खात्रीच होती. लहानपणी तू म्हणायचास की मी मोठा झाल्यावर कलेक्टर बनेन. अजूनही तुझी तीच इच्छा आहे का? तसे असेल तर खूपच छान तू नक्कीच एक चांगला प्रशासकीय अधिकारी होशील असे मला वाटते. तुझ्या आईबाबांनी तुझ्या अभ्यासासाठी परिश्रम घेतले आणि तुला चांगला पाठिंबा दिला म्हणून मी त्यांचेही अभिनंदन करतो.
आता ह्यापुढे तुझा खरा अभ्यास सुरू होईल, हे जरी खरे असले तरी दहावीची परीक्षा हा त्या अभ्यासातील एक महत्वाचा टप्पा असतो.
तुझ्या पुढल्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
तूझाच चुलत भाऊ,
रोहन पाटील.
रोशनी निवास,
आंबेडकर मार्ग,
गांधी चौक,
पुणे - ४१XXXX
मो. ९४००००००००
ई-मेल - rohan@gmail.com