इ. ९ वी & १० - मराठी व्याकरण
१. समास - २ गुण
✓आपण शब्दांची काटकसर करून एकच शब्द किंवा जोडशब्द तयार करतो, त्यास ‘समास’ असे म्हणतात.
✓ तयार होणा-या शब्दास 'सामासिक शब्द' असे म्हणतात.
उदा.
✓ नऊ रात्रींचा समूह - असे न म्हणता आपण 'नवरात्र' असे म्हणतो.
✓ येथे काही शब्दांची काटकसर करून केली जाते.नवीन तयार होणा-या 'नवरात्र' या शब्दाससामासिक शब्द असे म्हणतात.
अशाप्रकारे समास साधला जातो.
✓ चुकभूल – चूक अथवा भूल
✓ महादेव – महान असा देव
समासाचे मुख्य ४ प्रकार पडतात.
1. अव्ययीभाव समास
2. तत्पुरुष समास
3. व्दंव्द समास
4. बहुव्रीही समास
इ. ९ वी आणि इ. १० साठी फक्त दोन समास अभ्यासक्रमात समाविष्ट आहेत.
1. तत्पुरुष समास
2. व्दंव्द समास
✓ तत्पुरुष समास
1. ज्या समासात दूसरा शब्द प्रधान / महत्वाचा असतो त्यास तत्पुरुष समास असे म्हणतात.
उदा.
✓ नीलकमल - नील असे कमल
✓ चरणकमळ – चरण हेच कमळ
1. तत्पूरुष समासाचे 7 उपप्रकार पडतात. परंतु आपणास परीक्षेत फक्त 2 उपप्रकारावर प्रश्न विचारले जातात.
1. कर्मधारय तत्पूरुष समास
2. द्विगू तत्पूरुष समास
1. कर्मधारय तत्पुरुष समास
ज्या तत्पुरुष समासातील दोन्ही पदे प्रथमा विभक्तीत असतात व त्या दोन्ही पदांचा संबंध विशेषण व विशेष्य या प्रकारचा असतो त्यालाच कर्मधारेय तत्पुरुष समास म्हणतात.
✓ ट्रिक - कर्मधारय तत्पूरुष समासाचे उदाहरण ओळखण्यासाठी सामासिक शब्दाचे विग्रह करतानाअसे, सारखे, असा, सारखा, हेच, सारखी, अशीयांसारखे शब्द वापरले जातात.
✓नील कमल – नील असे कमल
✓रक्तचंदन – रक्तासारखे चंदन
✓पुरुषोत्तम – उत्तम असा पुरुष
✓महादेव – महान असा देव
✓पीतांबर – पीत असे अंब ज्याचेपीत (पिवळे,अंबरवस्त्र)
✓मेघशाम – मेघासारखा काळा
✓चरणकमळ – चरण हेच कमळ
✓खडीसाखर – खडयसारखी साखर
✓तपोबळ – तप हेच बळ
✓पुरुषोत्तम – उत्तम असा पुरुष
✓मुखकमल – मुख हेच कमल
✓वेशांतर – अन्य असा वेश
✓भाषांतर – अन्य अशी भाषा
✓महादेव – महान असा देव
✓लघुपट – लहान असा पट
✓रक्तचंदन – रक्तासारखे चंदन
✓विधाधन – विधा हेच धन
✓यशोधन – यश हेच धन
✓तपोबल – ताप हेच बल
✓काव्यांमृत – काव्य हेच अमृत
✓ज्ञांनामृत – ज्ञान हेच अमृत
✓सुयोग – सु (चांगला) असा योग
✓सुपुत्र – सु (चांगला) असा पुत्र
✓सुगंध – सु (चांगला) असा गंध
✓सुनयन – सु (चांगला) असा डोळे
✓कुयोग – कु (वाईट) असा योग
✓कुपुत्र – कु (वाईट) असा पुत्र
✓वज्रदेह – वज्रासारखे देह
✓चंद्रमुख – चंद्रासारखे मुख
✓राधेश्याम – राधेसारखा शाम
✓कमलनयन– कमळासारखे नयन
✓मुखचंद्र – चंद्रासारखे मुख
✓नरसिंह – सिंहासारखा नर
✓चरणकमल – कमलासारखे चरण
✓हृदयसागर – सागरासारखे हृदय
✓लालभडक – लाल भडक असा
✓श्यामसुंदर – श्याम सुंदर असा
✓काळाभोर – काळा भोर असा
✓पांढराशुभ्र – पांढरा शुभ्र असा
✓हिरवागार – हिरवागार असा
✓कृष्णधवल – कृष्ण धवल असा
२. व्दिगू समास
ज्या कर्मधारय समासातील पहिले पद हे संख्याविशेषण असते व त्या सामासिक शब्दांतून एक समूह सुचविला जातो. त्याला व्दिगू समास असे म्हणतात.
उदा.
✓नवरात्र – नऊ रात्रींचा समूह
✓पंचवटी – पाच वडांचासमूह
✓चातुर्मास – चार मासांचा समूह
✓त्रिभुवन – तीन भुवनांचा समूह
✓त्रैलोक्य – तीन लोकांचा समूह
✓सप्ताह – सात दिवसांचा समूह
✓चौघडी – चार घडयांचा समुह
✓बारभाही - बाराभावांचा समूदाय
ट्रिक - वरील समास ओळखण्यासाठी संख्या वाचक शब्द ध्यानात ठेवावे.
******************************************
2. द्वंद्व समास
✓ ज्या समासातील दोन्ही पद अर्थदृष्टया समान दर्जाचे असतात. त्यास ‘व्दंव्द समास’ असे म्हणतात.
✓ या समासातील पदे आणि, अथवा, व, किंवा, इतर, वगैरे या उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात.
उदा.
✓खरेखोटे – खरे आणि खोटे
✓तीनचार – तीन किंवा चार
✓बहीणभाऊ – बहीण आणि भाऊ
✓आईवडील – आई आणि वडील
✓बरेवाईट – बरे किंवा वाई
✓केरकचरा – केर, कचरा व इतर टाकाऊ पदार्थ
✓पानसुपारी – पान, सुपारी व इतर पदार्थ
✓व्दंव्द समासाचे खलील 3 प्रकार पडतात.
१. इतरेतर द्वंद्व समास
२. वैकल्पिक व्दंव्द समास
३. समाहार व्दंव्द समास
******************************
१. इतरेतर द्वंद्व समास
✓ ज्या समासाचा विग्रह करतांना आणि, व, ही, समुच्चय बोधक उभयान्वयी अव्ययांचा उपयोग करावा लागतो. त्यास इतरेतर व्दंव्द समास असे म्हणतात.
उदा.
✓कृष्णार्जुन – कृष्ण आणि अर्जुन
✓पशुपक्षी – पशू आणि पक्षी
✓बहीणभाऊ – बहीण आणि भाऊ
✓डोंगरदर्यात – डोंगर आणि दर्यात
✓आईबाप – आई आणि बाप
✓हरिहर – हरि आणि हर
✓स्त्रीपुरुष – स्त्री आणि पुरुष
***************************************
2. वैकल्पिक व्दंव्द समास
✓ज्या समासाचा विग्रह करतांना किंवा, अथवा, वा ही विकल्प बोधक उभयन्वयी अव्ययांचा उपयोग करावा लागतो त्यास वैकल्पिक व्दंव्द समास असे म्हणतात.
उदा.
✓चुकभूल – चूक अथवा भूल
✓न्यायान्याय – न्याय अथवा अन्याय
✓पापपुण्य – पाप किंवा पुण्य
✓सत्यासत्य – सत्य किंवा असत्य
✓खरेखोटे – खरे किंवा खोटे
✓तीनचार – तीन किंवा चार
✓बरेवाईट – बरे किंवा वाईट
✓पासनापास – पास किंवा नापास
✓मागेपुढे – मागे अथवा पुढे
3. समाहार व्दंव्द समास
✓ज्या समासातील पदांचा विग्रह करतांना त्यातील पदांचा अर्थशिवाय त्याच जातीच्या इतर पदार्थाचाही त्यात समावेश म्हणजेच समहार केलेला असतो त्यास समाहार व्दंव्द समास असे म्हणतात.
उदा.
✓वेणीफणी – वेणीफणी व इतर साजशृंगार
✓शेतीवाडी – शेती, वाडी व इतर तत्सम जायदाद
✓भाजीपाला – भाजी, पाला व तत्सम वस्तू
✓ केरकचरा – केरकचरा व इतर टाकाऊ पदार्थ
✓भाजीपाला – भाजी, पाला, मिरची, कोथंबीर यासारख्या इतर वस्तु
✓अंथरूणपांघरून – अंथरण्यासाठी पांघरण्यासाठी लागणार्या वस्तु व इतर कपडे
✓शेतीवाडी – शेती, वाडी व इतर तत्सम मालमत्ता
✓मिठभाकर – मीठ, भाकर व साधे खाधपदार्थ इत्यादी
✓चहापाणी – चहा, पाणी व फराळाचे इतर पदार्थ
✓केरकचरा – केर, कचरा व इतर टाकाऊ पदार्थ
✓पानसुपारी – पान, सुपारी व इतर पदार्थ
✓नदीनाले – नदी, नाले, ओढे व इतर
✓जीवजंतू – जीव, जंतू व इतर किटक