मराठी पत्र लेखन
पत्र मुख्यतः दोन प्रकारचे आहेत.
१.औपचारिक पत्र -
सरकारी कार्यालये, प्राचार्य, प्रकाशक, व्यावसायिक संस्था, दुकानदार इत्यादींसाठी .
२. अनौपचारिक पत्र -
जवळचे नातेवाईक, मित्र, परिचित, इत्यादींसाठी.
===================
१. औपचारिक पत्र -
प्र. विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने चांगल्या उपक्रमाबाबत सेवा ट्रस्टचे अभिनंदन करणारे पत्र लिहा. ०६ गुण
उत्तर -
दि. १३ मार्च, २०२१
प्रति,
मा. व्यवस्थापन,
सेवा ट्रस्ट,
माहेश्वरी चौक,
उमरखेड -४४५२०६.
विषय - अभिनंदन करण्याबाबत.
महोदय,
सध्या जागतिक तापमानात सतत वाढ होत आहे.
पर्यावरण असंतुलित आहे. या सर्वांचे दुष्परिणाम
जाणवू लागले आहे. यावर उपाय म्हणजे भरपूर झाडे लावणे व त्यांचे संवर्धन करणे हे प्रत्येक मानवाचे आद्य कर्तव्य आहे.
या पार्श्वभूमीवर आपली सेवा ट्रस्ट "झाडे
लावा..... झाडे जगावा" हे आपले ब्रीदवाक्य
प्रत्यक्षात अमलात आणण्यासाठी जागतिक
पर्यावरण दिनाचे औचित्य साधून विविध प्रकारच्या
रोपांचे मोफत वाटप करून लोकांना वृक्ष
लागवडीसाठी प्रोत्साहित करत आहे. आपल्या
मोफत रोपे वाटप उपक्रमामुळे हजारो लोक ही रोपे
घेऊन आपल्या परिसरात लावत आहेत. त्यामुळे
उजाड, भकास परिसर हिरवंगार होत आहे.
आपला हा मोफत रोप वाटपाचा उपक्रम
अभिनंदनास पात्र आहे. आमच्या शाळेचे सर्व
विद्यार्थी - विद्यार्थिनी व शिक्षकांच्या वतीने आपले
मन:पूर्वक अभिनंदन.
धन्यवाद.
आपली कृपाभिलाषी,
रोशनी पठाण
(विद्यार्थी प्रतिनिधी)
जि.प.हायस्कूल,
विडूळ - ४४५२०६
संपर्क : ९४००००००००
ई-मेल - roshani@gmail.com