जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालय, विडूळ ता . उमरखेड जि. यवतमाळ
ऑनलाईन परीक्षा
वर्ग - 10 वा, विषय - गणित भाग - I , गुण - 40, वेळ - 2 तास
दिनांक - 28 / 03 / 2021 , वेळ - 12 : 00 ते 2 : 00
-----------------------------------------------------------------
प्र. 1 (A) पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत . त्यांपैकी अचूक उत्तराचा पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा : 04
1. 4x + 5y = 19 या समीकरणाचा आलेख काढण्यासाठी 𝑥 = 1 असताना y ची किंमत ---- असेल.
A) 4 B) 3 C) 2 D) −3
2. वर्ग समीकरणांची कोटी --------------- असते.
A) 1 B) 2 C) 3 D) 4
3. एका अंकगणिती श्रेढीसाठी 5,12,19,26,........ a=?
(A) 12 (B) 26 (C) 19. (D) 5
4. एक फासा फेकला असता नमुना अवकाशातील नमुना घटकांची संख्या ......... आहे.
A) 4 B) 6 C) 2 D) 52
प्र. 1 (B) पुढील उपप्रश्न सोडवा : 04
1. पुढील समीकरणासाठी D ची किंमत काढा.
5x + 3y + 11 = 0 ; 2x + 4y = - 10
2. जर a = 1 , b = 4 , c = -5 तर b² – 4ac ची किंमत काढा.
3. अंकांची पुनरावृत्ती न करता 2,3,5 या अंकापासून दोन अंकी संख्या तयार केली तर नमुना अवकाश लिहा.
4. 2,4,6,8.........ही अंकगणिती श्रेढी आहे का ते ओळखा.
प्र. 2 A. पुढीलपैकी कोणत्याही दोन कृती पूर्ण करून लिहा. 04
ii)
iii)
प्र. 2 B . पुढील कोणतेही चार उपप्रश्न सोडवा. 08
1. एका वर्गसमीकरणाची मुळे 4 व -5 आहेत तर ते वर्गसमीकरण तयार करा.
2. जर 52 𝑥 + 65 𝑦 = 183 आणि 65 𝑥 + 52 𝑦 = 168 असेल तर 𝑥 + 𝑦 =?
3. एका अंकगणिती श्रेढीमध्ये a = 2 व d = 3 आहे तर S12 काढा.
4. तीन नाणी फेकली असता, छापा न मिळण्याची संभाव्यता काढा.
5.
प्र. 3 A. खालीलपैकी कोणतीही एक कृती सोडवा. 03
1.
2.
प्र. 3. B . पुढील कोणतेही दोन उपप्रश्न सोडवा. 06
1. खालील एकसामायिक समीकरण क्रेमरच्या नियमाने सोडवा.
3x − 4y = 10 ; 4x + 3y = 5
2. मुकुंदजवळ सागरपेक्षा 50 रु अधिक आहेत. त्यांच्याजवळील रकमांचा गुणाकार 15000 असेल तर प्रत्येकाजवळील रक्कम कती ?
3. फुगेवाला 2 लाल, 3 निळे आणि 4 हिरवे अशा रंगीत फुग्यातील एक फुगा प्रणालीला
यादृच्छिक पद्धतीने देणार आहे, तर पुढील घटना़ची संभाव्यता काढा.
i) मिळालेला फुगा लाल असणे.
ii) मिळालेला फुगा निळा असणे.
4. 4 ने भाग जाणाऱ्या तीन अंकी नैसर्गिक संख्यांची बेरीज काढा.
प्र. 4. खालीलपैकी कोणतेही दोन उपप्रश्न सोडवा. 08
1. एका अंकगणिती श्रेढीमध्ये t10 = 57 व t15 = 87 असल्यास t21 काढा.
2. पुढील एकसामायिक समीकरण आलेख पद्धतीने सोडवा.
𝑥 − 𝑦 = 1; 2 𝑥 + 𝑦 = 8
3. मनीषच्या आईचे आजचे वय त्याच्या वयाच्या 5 पटीपेक्षा 1 ने जास्त आहे. 4 वषाांपूर्वी
त्यांच्या वयांचा गुणाकार 22 असल्यास , त्यांची आजची वये काढा.
प्र. 5. पुढीलपैकी कोणताही एक उपप्रश्न सोडवा. 03
1. मी स्टेशनवरुन घरी जाण्यासाठी एक रिक्षा ठरवली. पहिल्या किलोमीटरसाठी x रूपये आणि पुढील प्रत्येक किलोमीटरसाठी y रूपये ठरले. दहा किलोमीटर गेल्यावर 40 रूपये झाले व 16 किलोमीटर गेल्यावर 58 रूपये झाले. तर पहिला किलोमीटरला किती भाडे होते ?
2. असे एक शाब्दिक उदाहरण तयार करा की त्यापासून मिळणाऱ्या वर्गसमीकरणाचे एक मूळ 5 असेल. समीकरण तयार करून लिहा.
--------------------------------------------------------------