जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालय, विडूळ ता . उमरखेड जि. यवतमाळ
ऑनलाईन परीक्षा
वर्ग - 10 वा , विषय :- विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग I,
गुण - 40, वेळ - 2 : 15 तास
दिनांक - 08 / 04 / 2021 , वेळ - 12 : 00 ते 2 : 15
-----------------------------------------------------------------
प्र. 1. (अ) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाचे वर्णाक्षर लिहा : 05
i) वातावरणातील बाष्पला........म्हणतात.
A. वाफB. आर्द्रताC. सापेक्ष आर्द्रताD. निरपेक्ष आर्द्रता
ii) जर होकायंत्र विद्युत वाहक तरेपासून दूर केले तर........
अ) सूचीतील विचलन कमी होत जाईलब) सूचीतील विचलन वाढत जाईलक)सूचीतील विचलनवर कोणताच परिणाम होणार नाहीड)सूचीतील विचलन अचानक वाढत जाईल
iii) 2HgO -->2Hg+O2
अ)संयोग अभिक्रिया ब) विस्थापण अभिक्रियाक) अपघटन अभिक्रियाड)क्षपण अभिक्रिया
iv) ज्या रासायनिक अभिक्रियेत अभिक्रिया कारकांपासून दोन किंवा अधिक उत्पादिते मिळतात त्याअभिक्रियेला ..... म्हणतात.
अ) अपघटन अभिक्रिया ब) संयोग अभिक्रिया क) विस्थापन अभिक्रिया ड) दुहेरी विस्थापन अभिक्रिया
v ) विद्युतशक्तिचे एकक ..........आहे.
अ)व्होल्टब)वॅट क)ज्युल ड)अॅम्पिअर
प्र. 1 ( ब ) पुढील उपप्रश्न सोडवा : 05
i) पुढील विधान चूक की बरोबर ते लिहा :
पहिल्या व आठव्या मूलद्रव्यांच्या गुणधर्मा मधील सारखेपणाला अष्टक नियम म्हणतात.
ii ) गटात न बसणारा शब्द ओळखा :
कार्बन, कॅल्शिअम, ऑक्सिजन, निऑन
iii) सहसंबंध ओळखा .
आयोडीन : स्थायू :: ब्रोमिन : ...............
iv) योग्य जोडी जुळवा :
स्तंभ 'अ' स्तंभ 'ब'
i. निरपेक्ष आद्रता अ) J/cal
ii. अप्रकट उष्मा ब) J/Kg° C
iii. विशिष्ट उष्माधारकता क) KJ/Kg
iv. उष्णता ड) एकक नाही इ) Kg/m3
v) नावे लिहा :
कवच संख्या 2 असणारी कोणती ही 2 मूलद्रव्ये
प्र. 2 (अ) शास्त्रीय कारणे लिहा : ( को. 2 ) 04
i) मेंडेलीव्हने आवर्तसारणीमध्ये काही जागा रिक्त ठेवल्या होत्या .
ii) पाण्याने भरलेल्या हौदाचा तळ वर उचलल्या सारखा भासतो .
iii) नाणी धातुंपासून व संमिश्रापासून तयार करतात.
प्र. 2 (ब) पुढील उपप्रश्न सोडवा : ( को. 3 ) 06
i. खाली दिलेल्या आधुनिक आवर्तसारणीत 1 ते 20 मूलद्रव्यांसाठी चौकटी दिलेल्या आहेत. त्यापैकी अ व ब मूलद्रव्य ओळखून त्यांचे अणुअंक सांगा .
ii. दिष्ट विद्यूतधारा व प्रत्यावर्ती विद्यूतधारा यातील फरक स्पष्ट करा .
iii. पुढील आलेखाचे निरीक्षण करा व प्रश्नांची उत्तरे लिहा .
ब) ही प्रक्रिया कोणत्या तापमानादरम्यान घडते ?
iv. प्रकाशाचे अपवर्तन म्हणजे काय ? त्याचे एक उदाहरण द्या .
प्र. 3 . पुढील उपप्रश्न सोडवा : ( को. 5 ) 15
i. आकृतीत दर्शवलेली अभिक्रिया थोडक्यात स्पष्ट करा .
ii. स्थायुच्या विशिष्ट उष्माधारकतेचे मापन मिश्रण पद्धतीने कसे करतात ते स्पष्ट करा .
iii. खाली दिलेल्या आकृतीतील मानवी डोळ्याच्या भागांना नावे द्या व त्यांची कार्य लिहा .
iv. सुबक, नामनिर्देशित आकृतीच्या साहाय्याने जलशक्तिवर आधारित विलगीकरण पद्धत स्पष्ट करा .
v. पुढील आकृतीचे निरीक्षण करून उत्तरे लिहा .
अ) पद्धतीचे नाव:-----------
आ) पद्धत स्पष्ट करा .
इ) या पद्धतीची दोन उदाहरणे लिहा .
vi. पुढील कार्बनी संयुगांची आय.यू. पी .ए.सी . नावे लिहून तक्ता पूर्ण करा .
vii. आयनिक संयुगांचे गुणधर्म लिहा .
viii. सैनिकी व दिशादर्शक उपग्रहाचे कार्य लिहा.
प्र. पुढील उपप्रश्न सोडवा : ( को. 1 ) 05
i. खालील तापमान - काल आलेख स्पष्ट करा .
ii. खाली ल परि च्छेद वा चून उत्तरे लि हा .
चंद्रानंतर पृथ्वीला दुसरी जवळची खगोलीय वस्तू म्हणजे मंगळ. मंगळाकडे ही अनेक राष्ट्रांनी याने पाठविली.
परंतु ही मोहीम अवघड असल्याने त्यातील जवळ जवळ अर्ध्या मोहिमा यशस्वी होऊ शकल्या नाहीत. मात्र आपल्याला
अभिमान वाटावा अशी कामगिरी केली आहे. इस्रोने अत्यंत कमी खर्चात नोव्हेंबर 2013 मध्ये प्रक्षेपित केलेले मंगल यान
सप्टेंबर 2014 मध्ये मंगळाच्या कक्षेत प्रस्थापित झाली व त्याने मंगळाचा पृष्ठभाग व वायुमंडल याबद्दल महत्त्वाची माहिती मिळविली.
अ) चंद्रानंतर पृथ्वीला सर्वात जवळची खगोलीय वस्तू कोणती?
आ) इस्रो ने मंगल यान मंगळाच्या कक्षेत केव्हा प्रस्तापित केले ?
इ) इस्रोच्या मंगळयानाने कोणती महत्वाची माहिती मिळवली ?
ई)विशिष्ट वेग हा उपग्रहाच्या वस्तुमानवर अवलंबून नसतो स्पष्ट करा ?
***********************************