जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालय, विडूळ ता . उमरखेड जि. यवतमाळ
ऑनलाईन परीक्षा
वर्ग - 10 वा , विषय :- विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग II, गुण - 40, वेळ - 2 तास
दिनांक - 31 / 03 / 2021 , वेळ - 12 : 00 ते 2 : 00-----------------------------------------------------------------
प्र. 1. (अ) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाचे वर्णाक्षर लिहा : 05
i. खालीलपैकी कोणता प्राणी उष्णरक्ती आहे ?
अ. वटवाघळ ब. कासव क. पाल ड. ससुसर
ii) अर्धगुणसुत्री विभाजनात गुणसुत्रांची संख्या ... होते.
अ. अनेकपट ब. तिप्पट. क. नीम्मी ड. दुप्पट
iii) जागतिक जैवविविधता दिन दरवर्षी ............ या दिवशी साजरा करतात.
अ) 5 जून ब) 21 मार्च क) 22 मे ड) 26 नोव्हेंबर
iv ) .............. या शेतकऱ्याचा मित्र म्हणतात.
अ) ससा ब) मांजर क) जळू ड) गांडूळ
v) अवयव प्रत्यारोपणासाठी ......... उपलब्ध होणे खूप गरजेचे असते.
अ) डॉक्टर ब) दवाखाना क) अवयवदाता ड) रूग्णवाहिका
प्र. 1 ( ब ) पुढील उपप्रश्न सोडवा : 05
i) पुढील विधान चूक की बरोबर ते लिहा :
मृत सजीवांच्या शरीरात C - 12 चा -हास ही एकच प्रक्रिया सतत चालू असते.
ii ) गटात न बसणारा शब्द ओळखा :
खवा, योगर्ट, लोणी, तूप
iii) सहसंबंध ओळखा .
शेगडी : औष्णिक ऊर्जा :: शिलाई मशीन : ..............
iv) योग्य जोडी जुळवा :
स्तंभ 'अ' स्तंभ 'ब'
i ) सूर्य प्रकाश a) पवन ऊर्जा
ii ) नैसर्गिक वायू b) पर्यावरणस्नेही उर्जा
c) जीवाश्म इंधने
d) आण्विक प्रारणे
v) नावे लिहा :
प्र. 2 (अ) शास्त्रीय कारणे लिहा : ( को. 2 ) 04
i) आई - वडीलांचे काही गुणधर्म त्यांच्या अपत्यात येतात.
ii) मद्यसेवन कधीही वाईटच असते.
iii) सूक्ष्मजैविक विकरे पर्यावरणस्नेही ठरतात.
प्र. 2 (ब) पुढील उपप्रश्न सोडवा : ( को. 3 ) 06
i. प्रथमोपचार पेटीतील आवश्यक साहित्यांची यादी तयार करा.
ii. फरक स्पष्ट करा : पक्षी व सस्तन प्राणी
iiii. टिप लिहा : भ्रूणविज्ञान
iv. मला नावे द्या
प्र. 3 . पुढील उपप्रश्न सोडवा : ( को. 5 ) 15
i. लॅमार्कवाद हा सिद्धांत स्पष्ट करा.
ii. ग्लुकोज विघटनाचे टप्पे स्पष्ट करा.
iii. प्रोबायोटिक्स मानवाला कशाप्रकारे उपयुक्त आहेत ?
iv. खालील तक्ता पूर्ण करा:
v.
vi. सौर परावर्तक महत्वाचा का आहे ?
vii. अवयव दान व देहदानाचे आपण अनेक व्यक्तींचे प्राण कसे वाचवू शकतो ?
VIII. पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा.
प्र. पुढील उपप्रश्न सोडवा : ( को. 1 ) 05
i. खालील आकृतीचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे द्या.
ii. खालील परिच्छेदावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहा.