जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालय, विडूळ ता . उमरखेड जि. यवतमाळ
ऑनलाईन परीक्षा
वर्ग - 10 वा , विषय :- विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग I, गुण - 40, वेळ - 2 तास
दिनांक - 30 / 03 / 2021 , वेळ - 12 : 00 ते 2 : 00-----------------------------------------------------------------
प्र. 1. (अ) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाचे वर्णाक्षर लिहा : 05
i) विषुववृत्तावर गुरुत्व त्वरण (g) चे मूल्य .... असते.
A. 9.78 m/s²B. 9.832 m/s²C. 9.8 m/s²D. 6.67 m/s²
ii) खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्याची इलेक्ट्रॉन गमावण्याची प्रवृत्ती सर्वात जास्त आहे ?
अ) Mg ब) Na क) Al ड) Cl
iii) अणुकेंद्रक व बाह्यतम कवच यामधील अंतर म्हणजे .....होय.
अ)अणुत्रिज्या ब) अणुव्यास क)अणुवस्तुमान ड)अणुआकारमान
iv) ज्या रासायनिक अभिक्रियेत एकाच अभिक्रिया कारकांपासून दोन किंवा अधिक उत्पादिते मिळतात त्या
अभिक्रियेला ..... म्हणतात.
अ) अपघटन अभिक्रिया ब) संयोग अभिक्रिया क) विस्थापन अभिक्रिया ड) दुहेरी विस्थापन अभिक्रिया
v ) विद्युतशक्तिचे एकक ..........आहे.
अ)व्होल्टब)वॅट क)ज्युल ड)अॅम्पिअर
प्र. 1 ( ब ) पुढील उपप्रश्न सोडवा : 05
i) पुढील विधान चूक की बरोबर ते लिहा :
पहिल्या व आठव्या मूलद्रव्यांच्या गुणधर्मा मधील सारखेपणाला अष्टक नियम म्हणतात.
ii ) गटात न बसणारा शब्द ओळखा :
कार्बन, कॅल्शिअम, ऑक्सिजन, निऑन
iii) सहसंबंध ओळखा .
हवेचा अपवर्तनांक : 1.0003 :: पाण्याचा अपवर्तनांक : ...............
iv) योग्य जोडी जुळवा :
स्तंभ 'अ' स्तंभ 'ब'
i ) दिष्ट विद्यूतधारा a) दोलायमान असते
b) दोलायमान नसते
v) नावे लिहा :
पारपटलाच्या मागे असलेला मांसल पडदा .
प्र. 2 (अ) शास्त्रीय कारणे लिहा : ( को. 2 ) 04
i) स्वयंपाकासाठी वापरण्यात येणाऱ्या काही स्टीलच्या भांड्यांचे तळ तांब्याचे असते.
ii) वनस्पती जन्य तेलाचे निकेल उत्प्रेरक वापरून वनस्पती तूप तयार करतात.
iii) प्रक्षेपक हे फार खर्चिक असतात.
प्र. 2 (ब) पुढील उपप्रश्न सोडवा : ( को. 3 ) 06
i. न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणा चा सिद्धांत लिहा .
ii. फरक स्पष्ट करा : धातु व अधातुंचे भौतिक गुणधर्म
iii. टिप लिहा : शृंखलाबंधनशक्ती
iv. पुढील ओघतकता पूर्ण करा .
प्र. 3 . पुढील उपप्रश्न सोडवा : ( को. 5 ) 15
i. 10, 20, 7 हे अणुअंक असणाऱ्या मूलद्रव्यांची माहिती तक्त्यात भरा .
ii. रासायनिक समीकरणांचे लेखन करतानाच्या तीन पायऱ्या उदाहरणासह लिहा
iii. विद्युत चलित्रची रचना व कार्य थोडक्यात स्पष्ट करा .
iv.
v. निसर्गातील इंद्रधनुष्य या सुंदर घटनेमागील प्रकाशाचे तीन एकत्रित गुणधर्म (घटना ), रिकाम्या वर्तुळात लिहा .
vi. प्रकाशापेक्षा अवकाशयान चंद्रावर पोहोचण्यास जास्त वेळ लागतो का ते स्पष्ट करा ?
vii. आकृतीचे निरीक्षण करून उत्तरे लिहा .
viii. पुढील कृतीपत्रिका योग्य उत्तरे लिहून पूर्ण करा .
प्र. पुढील उपप्रश्न सोडवा : ( को. 1 ) 05
i. खालील उतारा काळजीपूर्वक वाचून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहा .
पृथ्वीचे गुरुत्वीय बल सगळ्या वस्तूंवर प्रयुक्त होते हे आपल्याला माहीत आहे. आपण दगड हातात धरलेला असतानादेखील हे बल प्रयुक्त होतच होते. परंतु आपण हाताने विरुद्ध दिशेने लावत असलेले बल त्याला संतुलित करत होते व तो दगड स्थिर होता . आपण हातातून सोडून दिल्यावर दगडावर केवळ गुरुत्वीय बल प्रयुक्त होत असल्याने त्याच्या प्रभावाने तो दगड खाली पडला . जेव्हा एखादी वस्तू केवळ गुरुत्वीय बलाच्या प्रभावाने गतिमान असेल तर त्या गतीला मुक्त पतन म्हणतात. म्हणजे दगडा चे मुक्त पतन होते. मुक्त पतनात आरंभीचा वेग शून्य असतो व
कालानुसार गुरुत्वीय त्वरणामुळे तो वाढत जातो . पृथ्वीवर मुक्त पतनाच्या वेळी हवेशी होणाऱ्या घर्षणा मुळे वस्तूच्या गतीला विरोध होतो व वस्तूवर प्लावक बल ही कार्य करते . म्हणून खऱ्या अर्थाने मुक्त पतन हे हवेत होऊ शकत
नाही . ते केवळ निर्वातातच शक्य आहे.
अ) योग्य पर्याय निवडून खालील विधान पूर्ण करा .
हातात धरलेला दगड स्थिर असतो कारण त्यावर ....
a) दोन असंतुलित बले प्रयुक्त असतात.
b) केवळ पृथ्वीचे गुरुत्वीय बल प्रयुक्त असते.
c) पृथ्वी चे गुरुत्वी य बल प्रयुक्त नसते.
d) दोन असंतुलित बले प्रयुक्त असतात.
आ) पृथ्वीवर मुक्तपतन का होऊ शकत नाही ?
इ) मुक्तपतन होत असताना वस्तूचा वेग का वाढत जातो ?
ई) मुक्तपतन होत असताना वस्तूवर कोणत्या बलाचा प्रभाव असतो ?
उ) मुक्तपतन केवळ निर्वातातच का शक्य होते ?