# शब्दसिद्धी #
इयत्ता - १० वी बोर्ड परीक्षेत २ गुणांचा प्रश्न विचारला जातो.
✓ शब्द कसा तयार झाला आहे, म्हणजे सिद्ध कसा झाला आहे यालाच ‘शब्दसिद्धी’ असे म्हणतात.
✓ या घटकामध्ये आपणास फक्त
1. उपसर्गघटित शब्द
2. प्रत्ययघटित शब्द
3. अभ्यस्त शब्द
वरील घटकांवर प्रश्न विचारले जातात.
1. उपसर्गघटित शब्द
✓ "शब्दाच्या पूर्वी जी अक्षरे जोडली जातात त्यांना उपसर्ग असे म्हणतात. तसेच अशी अक्षरे जोडून जे शब्द तयार होतात त्या शब्दांना ‘उपसर्ग घटित शब्द’ असे म्हणतात."
उदा.
✓ परिहार, विहार, अपहार, संहार, उपहार, प्रहार, उपाहार , अनुभव, अपयश, अधिकार, अवगुण अधिपती, उपहार, आकार, साकार, प्रतिकार, प्रकार इ.
✓वरील शब्दांमध्ये परि, वि, अप,सं, उप,प्र, उप अनु. अप, अधि, अव, अधि, उप, आ, सा, प्रति,प्रइ. उपसर्ग लागलेली आपल्याला दिसतात. असे उपसर्ग लागून तयार होणार्या शब्दांना उपसर्ग घटित शब्द असे म्हणतात.
उपसर्ग मूळ शब्द उपसर्गघटित शब्द
आ जन्म आजन्म
अति लोभ अतिलोभ
अप मान अपमान
सु विचार सुविचार
अव कृपा अवकृपा
उप ग्रह उपग्रह
अ चूक अचूक
अ मर अमर
अ पार अपार
अ नाथ अनाथ
अ पात्र अपात्र
अ चल अचल
अ शांत अशांत
अ ज्ञान अज्ञान
अ माप अमाप
अ शुभ अशुभ
अ सत्य असत्य
अ बोल अबोल
अ खंड अखंड
सु मार्ग सुमार्ग
सु यश सुयश
सु + योग्य = सुयोग्य
वि + नाश = विनाश
आ + मरण = आमरण
ना + खूष = खूष
ना + पसंत = नापसंत
ना + पास = नापास
ना + बाद = नाबाद
बिन + चूक = बिनचूक
बिन + पगारी = बिनपगारी
गैर + हजर = गैरहजर
अप + मान = अपमान
अप + यश अपयश
अं + धार = अंधार
अ + समान = असमान
अ + स्थिर = अस्थिर
अ + न्याय = अन्याय
अ + पचन = अपचन
अ + जय = अजय
अ + प्रगत = अप्रगत
अ + मोल = अमोल
अ + योग्य = अयोग्य
कु + रूप = कुरूप
सु + काळ = काळ
सु + गंध = सुगंध
सु + पुत्र = सुपुत्र
2. प्रत्ययघटित शब्द
✓शब्दाच्या पुढे एक किंवा अधिक अक्षरे लावून प्रत्यय तयार होतात व तयार होणार्या शब्दांना ‘प्रत्ययघटित शब्द’ असे म्हणतात.
उदा.
प्रत्यय मूळ शब्द प्रत्ययघटित शब्द
न जन जनन
क जन जनक
नी जन जननी
ता जन जनता
✓जनन, जनक, जननी, जनता इ.
वरील शब्दांना न,क, नी ता ही प्रत्यय लागलेली आपल्याला दिसतात असे प्रत्यय लावून तयार होणार्या शब्दांना ‘प्रत्ययघटित शब्द’ असे म्हणतात.
अ- कर, लूट, डर, खोट, तूट, फूट
आ- ठेवा, ठेचा, वेढा, आढा, झगडा
आई- घडाई, शिलाई, चढाई, खोदाई
आऊ- लढाऊ, शिकाऊ, जळाऊ, टाकाऊ
आरी- रंगारी, पुजारी, पिंजारी
आळू- विसराळू, लाजाळू, झोपाळू
ई- मोडी, कढी, बुडी, कढी
ईक- पडीक, सडीक, पढीक
ईत- चकचकीत, लखलखीत
ईव- कोरीव, पाळीव, जाणीव, घोटीव, रेखीव
ऊ- झाडू, लागू, चालू
ऊन-देऊन, बसून, रडून, ऊडून, करून
खोर- चिडखोर, भांडखोर, दिवाळखोर
णावळ- खाणावळ, लिहिणावळ, धुणावळ, दळणावळ
प- कांडप, वाढप, दडप
पी-कांडपी, वाढपी, दडपी
णारा- ऐकणारा, लिहिणारा, सांगणारा, बोलणारा
लाजरा, कापरा, दुखरा, हसरा, नाचरा
आ- ठेवा, ठेचा, वेढा, आढा, झगडा
आई- घडाई, शिलाई, चढाई, खोदाई
आऊ- लढाऊ, शिकाऊ, जळाऊ, टाकाऊ
आरी- रंगारी, पुजारी, पिंजारी
आळू- विसराळू, लाजाळू, झोपाळू
ई- मोडी, कढी, बुडी, कढी
ईक- पडीक, सडीक, पढीक
ईत- चकचकीत, लखलखीत
ईव- कोरीव, पाळीव, जाणीव, घोटीव, रेखीव
ऊ- झाडू, लागू, चालू
ऊन-देऊन, बसून, रडून, ऊडून, करून
खोर- चिडखोर, भांडखोर, दिवाळखोर
णावळ- खाणावळ, लिहिणावळ, धुणावळ, दळणावळ
प- कांडप, वाढप, दडप
पी-कांडपी, वाढपी, दडपी
णारा- ऐकणारा, लिहिणारा, सांगणारा, बोलणारा
लाजरा, कापरा, दुखरा, हसरा, नाचरा
अ- चोर, देव, सर्प, माभ, भाव अक- तारक, मारक, रक्षक, लेखक, पाचक
अन- वदन, वंदन, नयन, पालन, चरण
अना- कल्पना, प्रार्थना, वेदना, तुलना
अनीय- रमणीय, श्रवणीय, वदनीय, पूजनीय
आ- कथा, इच्छा, चिंता
इ-ई - हरी, त्यागी, भाषी इक- पथिक, रसिक
त- हत, भूत, रत, कृत, मृत
तृ(ता)- श्रोता, दाता, ञाता, भर्ता
तव्य- श्रोतव्य, कर्तव्य, गन्तव्य
ति- युक्ति, नीति, शक्ती, स्तुति, कृती
य - त्याज्य, पेय, देय, भोग्य, कार्य
3. अभ्यस्त शब्द
✓काही शब्दांत एका शब्दाची अथवा काही अक्षरांनी पुनरावृत्ती झालेली असते. अशा शब्दांना ‘अभ्यस्त शब्द’ असे म्हणतात. अभ्यस्तचा अर्थ दुप्पट करणे असा होतो.
उदा.
आतल्या आत, शेजरीपाजारी, किरकिर इ.
अभ्यस्त शब्दांचे खलील 3 प्रकार पडतात.
i) पूर्णाभ्यस्त
ii) अंशाभ्यस्त
iii) अनुकरणवाचक
i) पूर्णाभ्यस्त शब्द
✓एक पूर्ण शब्द जेव्हा पुन्हा येऊन जोडशब्द तयार होतो त्याला पूर्णाभ्यस्त शब्द असे म्हणतात.
✓उदा. बारीकबारीक, कळाकाळा, आतल्याआत, हळहळ, वटवट, कळकळ, मळमळ, बडबड, समोरासमोर, हळूहळू, पुढेपुढे, पैसाच पैसा, मजाचमजा, हिरवेहिरवे इ.
ii) अंशाभ्यस्त शब्द
✓जेव्हा पूर्ण शब्द हा जोडशब्दात जशाच्या तसा पुन्हा येतो एखादे अक्षर बदलून येतो तेव्हा त्या जोडशब्दांना अंशाभ्यस्त शब्द असे म्हणतात.
✓उदा. अदलाबदल, उलटसुलटा, शेजारीपाजारी, बारीकसारीक, लाडीगोडी, सोक्षमोक्ष, जिकडेतिकडे, गोडधोड, गडबड, जाळपोळ, दगडबिगड, किडूकमिडूक, घरबीर इ.
iii) अनुकरणवाचक शब्द
✓ज्या शब्दांमध्ये एखाधा ध्वनिवाचक शब्दांची पुनरावृत्ती झालेली असते, अशा शब्दांना अनुकरणवाचक/नादानुकारी शब्द असे म्हणतात.
✓उदा. किरकिर, खडखडाट, रिमझिम, गुणगुण, घणघण, कडकडाट, टिकटिक, गडगड इ.