शब्दसंपत्ती
इयत्ता - १० वी बोर्ड परीक्षेत या घटकावर ४ गुणांचा प्रश्न विचारला जातो.
१. शब्दसमूहासाठी एक शब्द
२. समानार्थी शब्द
३. विरुद्धार्थी शब्द
४. शब्दातील अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द बनवणे
वरील घटकांवर १ -१ गुणांचे प्रश्न विचारले जातात.
१. शब्दसमूहासाठी एक शब्द
✓उंचावरून पडणारा पाण्याचा प्रवाह - धबधबा
✓ऐकायला येत नाही असा - - बहिरा
✓ऐकायला व बोलायला येत नाही असा - मूकबधीर
✓कथा सांगणारा - कथेकरी
✓कधीही जिंकला न जाणारा - अजिंक्य
✓कपडे धुण्याचे काम करणारा - धोबी
✓कपडे शिवण्याचे काम करणारा - शिंपी
✓कष्ट करून जगणारा - श्रमजीवी
✓कमी आयुष्य असणारा - अल्पायुषी
✓कर्तव्य तत्परतेने पार पडणारा - कर्तव्यदक्ष
✓कापड विणणारा - विणकर
✓कादंबरी लिहिणारा लेखक - कादंबरीकार
✓कविता करणारी - कवयित्री
✓किल्ल्याच्या सभोवतालची भिंत - तट
✓केवळ स्वतःचाच फायदा करू पाहणारा - स्वार्थी
✓केलेले उपकार जाणणारा - कृतज्ञ
✓केलेले उपकार विसरणारा - कृतघ्न
✓कैदी ठेवण्याची जागा - तुरुंग
✓कोणत्याही क्षेत्रात एकदम होणारा इष्ट बदल - क्रांती
✓खूप दानधर्म करणारा - दानशूर
✓खूप आयुष्य असणारा - दीर्घायुषी
✓खूप पाऊस पडणे - अतिवृष्टी
✓अनेक बाबींवर एकाच वेळी लक्ष ठेवणारा - अष्टावधानी
✓अनेक केळ्यांचा समूह - घड
✓अनेक गुरांचा समूह - कळप
✓अनेक फळांचा समूह - घोस
✓अनेक फुलांचा समूह - गुच्छ
✓अनेक माणसांचा समूह - जमाव
✓अंग चोरून काम करणारा - अंगचोर
✓अस्वलाचा खेळ करणारा - दरवेशी
✓ईश्वर आहे असे मानणारा - आस्तिक
✓लाज नाही असा - निर्लज्ज
✓लागत नाही असा - अथांग
✓वाद्य वाजवणारा - वादक
✓वाडवडिलांनी मिळवलेली - वडिलोपार्जित
✓विनामुल्य पाणी मिळण्याची जागा - पाणपोई
✓विमान चालवणारा - वैमानिक
✓व्याख्यान देणारा - व्याख्याता
✓शत्रूकडील बातमी काढणारा - हेर
✓शत्रूला सामील झालेला - फितूर
✓शेती करणारा - शेतकरी
✓शोध लावणारा - संशोधक
✓श्रमांवर जगणारा - श्रमजीवी
✓सतत काम करणारा - दिर्घोद्योगी
✓स्तुती गाणारा - भाट
✓सर्व इच्छा पूर्ण करणारा वृक्ष - कल्पवृक्ष
✓सर्व इच्छा पूर्ण करणारी गाय - कामधेनू
✓स्वर्गातील इंद्राची बाग - नंदनवन
✓स्वतः श्रम न करता खाणारा - ऐतखाऊ
✓स्वतःचा स्वार्थ न पाहणारा - निःस्वार्थी
✓संकटे हरणारा - विघ्नहर्ता
✓सूर्य उगवण्याची घटना - सूर्योदय
✓सूर्य मावळण्याची घटना - सूर्यास्त
✓सोन्याचांदीचे दागिने करणारा - सोनार
✓हत्तीला काबूत ठेवणारा - माहूत
✓हाताच्या बोटात घालायचं दागिना - अंगठी
✓हिमालयापासून कन्याकुमारीपार्यंत होडी ✓चालवणारा - नावाडी
✓दुसर्यावर अवलंबून असणारा - परावलंबी
✓दुसर्यावर उपकार करणारा - परोपकारी
दूरदर्शनवर, आकाशवाणीवर बातम्या सांगणारा - वृत्तनिवेदक
देशाची सेवा करणारा - देशसेवक
देवापुढे सतत जळणारा दिवा - नंदादीप
दोन किंवा अनेक नद्या एकत्र येतात ते ठिकाण - संगम
धान्य साठवण्याची जागा - कोठार
नदीची सुरवात होते ती जागा - उगम
नाटकांत किंवा चित्रपटांत काम करणारा - अभिनेता
नेहमी घरात बसून राहणारा - घरकोंबडा
पाऊस अजिबात न पडणे - अवर्षण
पायात चपला वा बूट न घालता चालणारा - अनवाणी
पायापासून डोक्यापर्यंत - आपादमस्तक
पालन करणारा - पालक
पायी चालणारा -
पादचारी
पुरामुळे नुकसान झालेला - पूरग्रस्त
पूर्वी कधी घडले नाही असे - अभूतपूर्व, अपूर्व
फुकट भोजन मिळण्याचे ठिकाण - सदावर्त, अन्नछत्र
बसगाड्या थांबण्याची जागा - बसस्थानक
बातमी आणून देणारा/देणारी - वार्ताहर
बोलता येत नाही असा - मुका
भाषण ऐकणारा - श्रोता
भाषण करणारा-वक्ता
माकडाचा खेळ करणारा - मदारी
मातीची भांडी करणारा - कुंभार
मृत्यूवर विजय मिळवणारा - - मृत्युंजय
रणांगणावर आलेले मरण - वीरमरण
रोग्यांची शुश्रुषा करणारी - परिचारिका
लग्नासाठी जमलेले लोक - वर्हाडी
लहानांपासून वृद्ध माणसांपर्यंत - आबालवृद्ध
लाकूडकाम दरणारा - सुतार
गुरे राखणारा - गुराखी
घरदार नष्ट झाले आहे असा - निर्वासित
घरापुढील मोकळी जागा - अंगण
घरे बांधणारा - गवंडी
चार रस्ते एकत्र येतात ती जागा - चौक
चांदण्या रात्रीचा पंधरवडा - शुक्लपक्ष
चित्रे काढणारा - चित्रकार
जमिनीवर राहणारे प्राणी - भूचर
जादूचे खेळ करून दाखवणारा - जादूगार
जे प्रत्यक्षात नाही ते आहे असे भासणे - आभास
जेथे वस्तू विकल्या जातात ती जागा - दुकान
ज्याचे वर्णन करणे शक्य नाही ते - अवर्णनीय
ज्याचे कधी विस्मरण होत नाही ते - अविस्मरणीय
ज्याला एकही शत्रू नाही असा - अजातशत्रू
ज्याला आईवडील नाहीत असा - अनाथ, पोरका
ज्याला मरण नाही असा - अमर
ज्याला कधी म्हातारपण येत नाही असा - वजर
ठरावीक काळाच्या अंतराने प्रकाशित होणारे - नियतकालिक
एकत्र येतात ती जागा - तिठा
झाडांची निगा राखणारा - माळी
तिथी (दिवस, वेळ) न ठरवता (अचानक) आलेला - अतिथी
दगडावर कोरलेले लेख - शिलालेख
दगडावर मूर्ती घडवणारा - शिल्पकार
दररोज प्रसिद्ध होणारे - दैनिक
दर आठवड्याने प्रसिद्ध होणारे - साप्ताहिक
दर पंधरवड्याने प्रसिद्ध होणारे - पाक्षिक
दर महिन्याला प्रसिद्ध होणारे - मासिक
दर तीन महिन्यांनी प्रसिद्ध होणारे - त्रैमासिक
दर सहा महिन्यांनी प्रसिद्ध होणारे - षण्मासिक
दर वर्षाला प्रसिद्ध होणारे - वार्षिक
दारावरील पहारेकरी - द्वारपाल, दरवान
दुष्काळात सापडलेले - दुष्काळग्रस्त
२. समानार्थी शब्द
उपवन = बगीचा
उदर = पोट
उदास = खिन्न
उत्कर्ष = भरभराट
उपद्रव = त्रास
उपेक्षा = हेळसांड
उठावाची = उठायची
ऊर्जा = शक्ती
ॠण = कर्ज
ॠतू = मोसम
ऋषी = तपस्वी, मुनी, साधू, तापस
एकजूट = एकी, ऐक्य
ऐश्वर्य = वैभव
ऐट = रुबाब, डौल
कथा = गोष्ट, कहाणी, हकिकत
कठीण = अवघड
कविता = काव्य, पद्य
करमणूक = मनोरंजन
कठोर = निर्दय
कनक = सोने
कटी = कंबर
कमळ = पंकज, अंबुज, नलिनी, अळत, पद्म, सरोज, अंभोज, अरविंद, राजीव, अब्ज
कपाळ = ललाट, भाल, कपोल, निढळ, अलिक
कष्ट = श्रम, मेहनत
कंजूष = कृपण
काम = कार्य, काज
काठ = किनारा, तीर, तट
काळ = समय, वेळ, अवधी
कान = श्रवण
कावळा = काक, एकाक्ष, वायस
कालांतराने = दिसामासा
काष्ठ = लाकूड
कासव = कूर्म, कामट, कमठ, कच्छप, कच्छ
किल्ला = गड, दुर्ग
किमया = जादू
कार्य = काम
कार्यक्षम = कुशल, दक्ष, निपुण, हुशार
कारागृह = कैदखाना, तुरुंग
कीर्ती = प्रसिद्धी, लौकिक, ख्याती
कुतूहल = उत्सुकता
कुटुंब = परिवार
कुशल = हुशार, तरबेज
कुत्रा = श्वान
कुटी = झोपडी
कुचंबणा = घुसमट
कृपण = कंजूष
कृश = हडकुळा
कोवळीक = कोमलता
कोठार = भांडार
कोळिष्टक = जळमट
खण = कप्पा
खल = नीच, दुष्ट, दुर्जन
खडक = मोठा दगड, पाषाण
खटाटोप = प्रयत्न
खग = पक्षी, विहंग, व्दिज, अंडज, शकुन्त
खड्ग = तलवार
खरेपणा = न्यायनीती
ख्याती = कीर्ती, प्रसिद्धी, लौकिक
खात्री = विश्वास
खाली जाणे = अधोगती
खाटा करणे = आंबवणे
खिडकी = गवाक्ष
खेडे = गाव, ग्राम
खोड्या = चेष्टा, मस्करी
गरज = आवश्यकता
गरवार = गर्भवती
गवत = तृण
अनाथ = पोरका
अनर्थ = संकट
अपघात = दुर्घटना
अपेक्षाभंग = हिरमोड
अभिवादन = नमस्कार, वंदन, प्रणाम
अभिनंदन = गौरव
अभिमान = गर्व
अभिनेता = नट
अरण्य = वन, जंगल, कानन, विपिन
अवघड = कठीण
अवचित = एकदम
अवर्षण = दुष्काळ
अविरत = सतत, अखंड
अडचण = समस्या
अभ्यास = सराव, परिपाठ, व्यासंग
अन्न = आहार, खाद्य
अग्नी = आग, अनल, विस्तव, वन्ही, अंगार, पावक, हुताशन, शिखी
अना = आणि
अगणित = असंख्य, अमर्याद
अचल = शांत, स्थिर
अचंबा = आश्चर्य, नवल
अतिथी = पाहुणा
अत्याचार = अन्याय
अपराध = गुन्हा, दोष
अपमान = मानभंग
अपाय = इजा
अही = साप, भुजंग, सर्प, व्याळ, पन्नग, फनी
अश्रू = आसू
अंबर = वस्त्र
अंधार = काळोख, तिमीर, तम
अमृत = पीयूष, सुधा
अहंकार = गर्व
अंक = आकडा
आई = माता, माय, जननी, माउली, जन्मदा, जन्मदात्री
आकाश = आभाळ, गगन, नभ, अंबर, आवकाश, अंतरीक्ष, व्योम, ख, अंतराळ, वियत, वितान
आठवण = स्मरण, स्मृती, सय
आठवडा = सप्ताह
आनंद = हर्ष, तोष, मोद, संतोष, प्रमोद, उल्हास, उद्धव
आजारी = पीडित, रोगी
आयुष्य = जीवन, हयात
आतुरता = उत्सुकता
आरोपी = गुन्हेगार, अपराधी
आश्चर्य = नवल, अचंबा, विस्मय, अचरथ, आचोज
आसन = बैठक
आदर = मान
आवाज = ध्वनी, रव
आवाजमां = आवाजात
आज्ञा = आदेश, हुकूम
आपुलकी = जवळीकता
आपत्ती = संकट
आरसा = दर्पण, मुकुर, आदर्श
आरंभ = सुरवात
आशा = इच्छा
आस = मनीषा
आसक्ती = लोभ
आळशी = कुजर, निरुद्योगी, ऐदी, आळसट
आशीर्वाद = शुभचिंतन
ओंजळभर = अंजूरभर
ओझे = वजन, भार
ओढा = झरा, नाला
ओळख = परिचय
औक्षण = ओवाळणे
अंत = शेवट
अंग = शरीर
अंघोळ = स्नान
अंधार = काळोख, तिमिर
अंगण = आवार
अंगार = निखारा
अंतरिक्ष = अवकाश इलाज = उपाय
इशारा = सूचना
इंद्र = सुरेंद्र, नाकेश, वसाव, सहस्त्राक्ष, वज्रपाणी, देवेंद्र
इहलोक = मृत्युलोक
ईर्षा = चुरस
इच्छा = आकांक्षा, आस, मनीषा, स्पृहा, लिप्सा, अपेक्षा
ईश्वर = देव, ईश, निर्जर, परमेश्वर, अलक्ष, सूर, विभूध, अलख, प्रभू, त्रिदश
उत्सव = समारंभ, सण, सोहळा
उक्ती = वचन
उशीर = विलंब
गरुड = खगेंद्र, खगेश्वर, तार्क्ष्य, वैनतेय
गणपती = लंम्बोदर, गजानन, हेरंब, लक्षप्रद, निधी, धरणीधर, वक्रतुंड
गर्व = अहंकार
गाय = धेनू, गोमाता
गाणे = गीत, गान
गंमत = मौज, मजा
गंध = वास, दरवळ
ग्रंथ = पुस्तक
गाव = ग्राम, खेडे
गाजावाजा झाला = कीर्ती पसरली
गुन्हा = अपराध
गुलामी = दास्य
गोड = मधुर
गोणी = पोते
गोष्ट = कहाणी, कथा
गौरव = सन्मान
ग्राहक = गिऱ्हाईक
घर = सदन, गृह, निकेतन, आलय, भवन, निवास, धाम, घृह
घरटे = खोपा
घागर = घडा, मडके
घोडा = अश्व, हय, वारू, तुरंग, वाजी
घोयका = घोळका, जमाव
चव = रुची, गोडी
चरण = पाय, पाऊल
चरितार्थ = उदरनिर्वाह
चक्र = चाक
चऱ्हाट = दोरखंड
चाक = चक्र
चंद्र = शशी, रजनीनाथ, इंदू , सुधाकर, निशानाथ, हिमांशू, शशांक, नक्षत्रेष, विधू, सोम
चांदणे = कौमुदी, चंद्रप्रकाश, चंद्रिका, ज्योत्स्ना
चिंता = काळजी
चिडीचूप = शांत
चिमुरडी = लहान
चूक = दोष
चेहरा = मुख
चौकशी = विचारपूस
छंद = नाद, आवड
छान = सुरेख, सुंदर
छिद्र = भोक
जग = दुनिया, विश्व
जत्रा = मेळा
जन = लोक, जनता
जमीन = भूमी, धरती, भुई
जंगल = रान
ज्यातात = जात्यात
जीव = प्राण
जीवन = आयुष्य, हयात
जुलूम = अत्याचार, छळ, बळजोरी, अन्याय
झाड = वृक्ष, तरू, पादप, द्रूप, गुल्म, अगम, विटप, शाखी
झोपडी = कुटीर, खोप
झोप = निद्रा
झोका = झुला
झेंडा = ध्वज, निशाण
झुंझुरका = पहाटेस
टेकडी = हुकडी
ठग = चोर
ठिकाण = स्थान
डोके = मस्तक, शीर्ष, शीर
डोळा = नेत्र, नयन, लोचन, चक्षु, अक्ष, आवळू, अंबक
डोया = डोळा
डोंगर = पर्वत, गिरी
ढग = मेघ, जलद, पयोधर, अभ्र, अंबूद, निरद, पयोद, अब्द, घन
ॠण = कर्ज
तक्रार = गाऱ्हाणे
तलाव = तडाग, सरोवर, कासार
तळे = तलाव, सरोवर, तडाग
त्वचा = कातडी
तारण = रक्षण
ताणीस्नी = ताणून
ताल = ठेका
तुरंग = कैदखाना, बंदिवास
तुलना = साम्य
तोंड = तुंड, वक्र, आनन, वदन, मुख
थट्टा = मस्करी, चेष्टा
थवा = समूह
थोबाड = गालपट
दगड = पाषाण, खडक
दरवाजा = दार, कवाड
दाम = पैसा
दृश्य = देखावा
दृढता = मजबुती
दिवस = दिन, वार, वासर
दिवा = दीप, दीपक
दूध = दुग्ध, पय, क्षिर
द्वेष = मत्सर, हेवा
देव = ईश्वर, विधाता
देह = तनु, तन, काया, वपू, शरीर
देश = राष्ट्र
देखावा = दृश्य
देखत = बघत, पाहत
दार = दरवाजा
दारिद्र्य = गरिबी
दौलत = संपत्ती, धन
धरती = भूमी, धरणी
ध्वनी = आवाज, रव
नदी = सरिता, तटिनी, तरंगिणी, जलवाहिनी
नजर = दृष्टी
नवरा =भ्रतार, वल्लभ, पती, कांत, नाथ, दादला, धव, अम्बुला, कवेश
नक्कल = प्रतिकृती
नमस्कार = वंदन, नमन
नातेवाईक = नातलग
नाच = नृत्य
निश्चय = निर्धार
निर्धार = निश्चय
निर्मळ = स्वच्छ
नियम = पद्धत
निष्ठा = श्रद्धा
नृत्य = नाच
नोकर = सेवक
न्हौतं = नव्हते
परिश्रम = कष्ट, मेहनत
पती = नवरा, वर
पत्र = टपाल
पहाट = उषा
परीक्षा = कसोटी
पर्वा = चिंता, काळजी
पर्वत = डोंगर, गिरी, अचल, शैल, अद्री
पक्षी = पाखरू, खग, विहंग, व्दिज, अंडज
पाडा = आदीवासींची १०-१५ घरांची वस्ती
प्रकाश = उजेड
प्रवास = सफर, फेरफटका, पर्यटन
प्रवासी = वाटसरू, पांथस्थ, मार्गिक
प्रजा = लोक
प्रत - नक्कल
पत्नी = बायको, अम्बुला, अस्तुरी, अर्धागी, भार्या, कांता, दारा, जाया, सहधर्मचारिणी
प्रदेश = प्रांत
प्रवास = यात्रा
प्राण = जीव
पान = पत्र, पत्ता, पर्ण
प्रासाद = वाडा
पाखरू = पक्षी
पाऊल = पाय, चरण
पाऊलवाट = पायवाट
प्रार्थना = स्तवन
प्रामाणिकपणा = इमानदारी
प्रारंभ = सुरुवात, आरंभ
प्रेम = प्रीती, माया, जिव्हाळा
प्रोत्साहन = उत्तेजन
पोपट = राघू, शुक
पाऊस = वर्षा, पर्जन्य
पाणी = जल, नीर, तोय, उदक, जीवन, सलिल, पय, अंबू, अंभ, वारी
पिशवी = थैली
पुस्तक = ग्रंथ
पुतळा = प्रतिमा, बाहुले
पुरातन = प्राचीन
पुंजा = पूजन
पृथ्वी = धरणी, जमीन, वसुंधरा, वसुधा, धरा, भुमी, धरित्री, मही, अवनी, भू, क्षमा, उरबी, कुंभिनी, मेदिनी, विश्वंभरा, क्षिती
फलक = फळा
फांदी शाखा
फूल = पुष्प, सुमन, कुसुम
बदल = फेरफार, कलाटणी
बर्फ = हिम
बहीण = भगिनी
बक्षीस = पारितोषिक, पुरस्कार
बाग = बगीचा, उद्यान, वाटिका
बासरी = पावा
बेत = योजना
बाळ = बालक
बाप = पिता, वडील, जनक
बादशाहा = सम्राट
बुद्धी = मती
ब्रीद = बाणा
भरवसा = विश्वास
भरारी = झेप, उड्डाण
भव्य = टोलेजंग
भुंगा = भ्रमर, भृंग, मिलिंद, मधुकर
भाट = स्तुतिपाठक
भारती = भाषा, वैखरी
भांडण = तंटा
भाळ = कपाळ
भाऊ = बंधू, सहोदर, भ्राता
भेसळ = मिलावट
भेदभाव = फरक
भोजन = जेवण
भोंग = खोपटे, झोपडी
मदत = साहाय्य
ममता = माया, जिव्हाळा, वात्सल्य
मन = चित्त, अंतःकरण
मजूर = कामगार
महिना = मास
महिला = स्त्री, बाई, ललना
मजूर = कामगार
मस्तक = डोके, शीर, माथा
मानवता = माणुसकी
मान = गळा
माणूस = मानव
मंगल = पवित्र
मंदिर = देऊळ, देवालय
मंदपणा = मंडपाच्या
मंडपामां = मंडपामध्ये
मार्ग = रस्ता, वाट
म्होरक्या = पुढारी, नेता
मोहाची फुले = मोवा
मित्र = दोस्त, सोबती, सखा, सवंगडी
मिष्टान्न = गोडधोड
मुलगा = पुत्र, सुत, तनय, नंदन, तनुत
मुलगी = कन्या, तनया, दुहिता, नंदिनी, आत्मजा
मुद्रा = चेहरा, मुख, तोंड, वदन
मुख = तोंड, चेहरा
मुलुख = प्रदेश, प्रांत, परगणा
मेहनत = कष्ट, श्रम, परिश्रम
मैत्री = दोस्ती
मौज = मजा, गंमत
यश = सफलता
युक्ती = विचार, शक्कल
युद्ध = लढाई, संग्राम, लढा, समर
येतवरी = येईपर्यंत
योद्धा = लढवय्या
रक्त = रुधिर
रणांगण = रणभूमी, समरांगण
र्हास = हानी
राग = क्रोध, संताप, चीड
राजा = नरेश, नृप, भूपाल, राणा, राया
राष्ट्र = देश
रांग = ओळ
रात्र = निशा, रजनी, यामिनी
रान = वन, जंगल, अरण्य, कानन
रूप = सौंदर्य
रुबाब = ऐट, तोरा
रेखीव = सुंदर, सुबक
लग्न = विवाह, परिणय
लाट = लहर
लाज = शरम,
लोभ = हाव
लोटके = मडके
वरचा = वद्राचा
वडील = पिता
वस्त्र = कपडा
वद्रा = वर
वारा = वात, पवन, अनिल, मारुत, समीर, वायू
वाट = मार्ग, रस्ता
वाद्य = वाजप
वातावरण = रागरंग
वेग = गती
वेळ = समय, प्रहर
वेळू = बांबू
वेश = सोशाख
वेदना = यातना
विश्रांती = विसावा, आराम
वितरण = वाटप, वाटणी
विद्या = ज्ञान
विनंती = विनवणी
विरोध = प्रतिकार, विसंगती
विसावा = विश्रांती, आराम
विश्व = जग, दुनिया
वीज = विद्युर, सौदामिनी
वृत्ती = स्वभाव
वृद्ध = म्हातारा
वैराण = ओसाड, भकास, उजाड
वैरी = शत्रू, दुष्मन
वैषम्य = विषाद
व्यवसाय = धंदा
व्याख्यान = भाषण
शरीर = देह, तनू, काया, कुडी, अंग
शक्ती = सामर्थ्य, जोर, बळ
शर्यत = स्पर्धा, होड, चुरस
शहर = नगर
शंकर = चंद्रचूड
श्वापद = जनावर
शास्त्रज्ञ = वैज्ञानिक
शाळा = विद्यालय
शाळुंका = शिविलिंग
शेत = शिवार, वावर, क्षेत्र
शिवार = शेत, वावर
शीण = थकवा
शील = चारित्र्य
शीतल = थंड, गार
शिक्षा = दंड, शासन
श्रम = कष्ट, मेहनत
सकाळ = प्रभात, उष:काल
सचोटी = खरेपणा
सफाई = स्वच्छता
सवलत = सूट
सजा = शिक्षा
सन्मान = आदर
सांगत = म्हणत
संकट = आपत्ती
संधी = मोका
संत = सज्जन, साधू
संपत्ती = धन, दौलत, संपदा
सायंकाळ = संध्याकाळ
सावली = छाया
साथी = सोबती, मित्र, दोस्त, सखा
स्तुती = प्रशंसा
स्पर्धा = चुरस, शर्यत, होड, पैज
स्थान = ठिकाण, वास, ठाव
स्त्री = बाई, महिला, ललना
संध्याकाळ = सायंकाळ, सांज
स्फूर्ती = प्रेरणा
स्वच्छता = झाडलोट
सुवास = सुगंध, परिमल, दरवळ
सुंदर = सुरेख, रमणीय, मनोहर, छान
सागर = समुद्र, सिंधू, रत्नाकर, जलधी, दर्या, अर्णव
सावली = छाया
सामर्थ्य = शक्ती, बळ
साहित्य = लिखाण
सेवा = शुश्रूषा
सिनेमा = चित्रपट, बोलपट
सिंह = केसरी, मृगराज, वनराज
सीग = शीग
सुविधा = सोय
सुगंध = सुवास, परिमळ, दरवळ
सूत = धागा, दोरा
सूर = स्वर
सूर्य = रवी, भास्कर, दिनकर, सविता, मित्र, अरुण, भानू, आदित्य
सोने = सुवर्ण, कांचन, हेम, कनक
सोहळा = समारंभ
हद्द = सीमा, शीव
हत्ती = गज, पिलू, सारंग, कुंजर
हर्दमच्यावानी = नेहमीप्रमाणे
हल्ला = चढाई
हळू चालणे = मंदगती
र्हायणं = राहिले
हकिकत = गोष्ट, कहाणी, कथा
हात = हस्त, कर, बाहू
हाक = साद
हारीच = एकत्र
हित = कल्याण
हिंमत = धैर्य
हुकूमत = अधिकार
हुरूप = उत्साह
हुबेहूब = तंतोतंत
हुभा = उभा
हेका = हट्ट, आग्रह
क्षमा = माफी
३. विरुद्धार्थी शब्द
स्तुती x निंदा
स्वस्त x महाग
स्वाधीन x पराधीन
स्वागत x निरोप
स्वार्थ x परमार्थ
स्वार्थी x निःस्वार्थी
स्पष्ट x अस्पष्ट
सावध x बेसावध
साहसी x भित्रा
सार्थ x व्यर्थ
साम्य x फरक
सान x थोर
सावकाश x पटकन
सार्वजनिक x खाजगी
सानुली x मोठी
सामुदायिक x वैयक्तिक
स्थिर x अस्थिर
सुप्रसिद्ध x कुप्रसिद्ध
सुरक्षित x असुरक्षित
सुख x दु:ख
सुटका x अटक
सुशिक्षित x अशिक्षित
सुगंध x दुर्गंध
सुंदर x कुरूप
सुदैवी x दुर्दैवी
सुरुवात x शेवट
घट्ट x सैल, पातळ
घाऊक x किरकोळ
चढ x उतार
चल x अचल, स्थिर
चढाई x माघार
चढणे x उतरणे
चवदार x बेचव
चपळ x सुस्त
चंचल x स्थिर
चांगले x वाईट
चूक x बरोबर
चोर x गोलीस
चिमुकला x थोरला
चिरंजीव x अल्पजीवी
छोटी x मोठी
छोटेसे x मोठेसे
जड x हलके
जय x पराजय
जन्म x मृर्यू
जवळची x लांबची
जगणे x मरणे
जमा x खर्च
जबाबदार x बेजबाबदार
जर x तर
जलद x हळू
जागणे x झोपणे
जास्त x कमी
जागरूक x निष्काळजी
जागृत x निद्रिस्त
जाणे x येणे
जिवंत x मृत
जिंकणे x हरणे
जीत x हार
जुने x नवे
जेवढा x तेवढा
जोश x कंटाळा
झोप x जाग
झोपडी x महाल
टंचाई x विपुलता
टिकाऊ x ठिसूळ
ठळक x पुसट
डावा x उजवा
डौलदार x बेढप
तरुण x म्हातारा
तहान x भूक
तुरळक x दाट
ताजे x शिळे
तारक x मारक
ताजी x शिळी
ताल x बेताल
तेजस्वी x निस्तेज
तेजी x मंदी
तीव्र x सौम्य
तीक्ष्ण x बोथट
तिरके x सरळ
तिरपा x सरळ
थंड x गरम
थंडी x उष्मा
थोर x लहान
थोरला x धाकटा
थोडे x जास्त
दया x राग
दयाळू x जुलमी
दाट x विरळ
दीन x रात
दिवस x रात्र
दीर्घ x ऱ्हस्व
दुरित x सज्जन
दुःख x सुख
दुष्काळ x सुकाळ
दुष्ट x सुष्ट
देशभक्त x देशद्रोही
देव x दानव, दैत्य
दृष्ट x सुष्ट
दोषी x निर्दोषी, निर्दोष
द्वेष x प्रेम
धनवंत x निर्धन, कंगाल
धडधाकट x कमजोर
धर्म x अधर्म
धाडस x भित्रेपणा
धूसर x स्पष्ट
धिटाई x भित्रेपणा, भ्याडपणा
धीट x भित्रा
धूर्त x भोळा
नफा x तोटा
नवे x जुने
नम्रता x उद्धटपणा
नाजूक x राठ
निद्रा x जागृती
निर्मळ x मळकट
निमंत्रित x आगंतुक
निंदा x स्तुती
निर्दयता x सहृदयता, सदयता
निर्बंध x मोकळीक
निर्जीव x सजीव
निराश x उत्साही
निःशस्त्र x शस्त्रधारी
निश्चित x अनिश्चित
निष्काम x सकाम
निर्भय x भयभीत
नीती x अनीती
नीटनेटका x गबाळ्या
नोकर x मालक
नेहमी x क्वचित
नुकसान x फायदा
नेता x अनुयायी
न्याय x अन्याय
पक्की x कच्ची
पडका x धडका
पराक्रमी x भित्रा
परका x स्वकीय
पहिला x शेवटचा
पलीकडे x अलीकडे
परवानगी x बंदी
प्रकाश x अंधार
प्रश्न x उत्तर
प्रामाणिकपणा x लबाडी
प्राचीन x अर्वाचीन
प्रेमळ x रागीट
प्रेम x द्वेष
प्रचंड x चिमुकला
प्रत्यक्ष x अप्रत्यक्ष
प्रतिकार x सहकार
प्रमाण x अप्रमाण
प्रगती x अधोगती
पाप x पुण्य
पात्र x अप्रात्र
पायथा x शिखर
पांढरा x काळा
प्रारंभ x अंत
पुढची x मागची
पुष्कळ x थोडे
पूर्ण x अपूर्ण
पूर्व x पश्चिम
पौर्णिमा x अमावास्या
प्रिय x अप्रिय
अथ x इति
अजर x जराग्रस्त
अमर x मृत्य
अधिक x उणे
अलीकडे x पलीकडे
अवघड x सोपे
अंत x प्रारंभ
अचल x चल
अचूक x चुकीचे
अडाणी x शहाणा
अटक x सुटका
अतिवृष्टी x अनावृष्टी
अती x अल्प
अर्थ x अनर्थ
अनुकूल x प्रतिकूल
अभिमान x दुरभिमान
अरुंद x रुंद
अशक्य x शक्य
अंधकार x प्रकाश
अस्त x प्रारंभ
अडचण x सोय
अपेक्षित x अनपेक्षित
अशक्त x सशक्त
अर्धवट x पूर्ण
अमूल्य x कवडीमोल
असतो x नसतो
अपेक्षाभंग x अपेक्षापूर्ती
अंथरूण x पांघरूण
अग्रज x अनुज
अनाथ x सनाथ
अतिवृष्ट x अनावृष्टी
अधोगती x प्रगती, उन्नती
अबोल x वाचाळ
अब्रू x बेअब्रू
अल्लड x पोक्त
अवखळ x गंभीर
अवजड x हलके
आरंभ x शेवट
आठवण x विस्मरण
आशा x निराशा
आता x नंतर
आत x बाहेर
आनंद x दु:ख
आला x गेला
आहे x नाही
आळशी x उद्योगी
आकर्षण x अनाकर्षण
आकाश x पाताळ
आतुरता x उदासीनता
ओबडधोबड x गुळगुळीत
आदर्श x अनादर्श
आवडते x नावडते
आवश्यक x अनावश्यक
आज्ञा x अवज्ञा
आधी x नंतर
आघाडी x पिछाडी
आजादी x गुलामी
आशीर्वाद x शाप
आस्था x अनास्था
आदर x अनादर
आडवे x उभे
आयात x निर्यात
आंधळा x डोळस
ओला x सुका
ओली x सुकी
ओळख x अनोळख
इकडे x तिकडे
इथली x तिथली
इष्ट x अनिष्ट
इमानी x बेइमानी
इच्छा x अनिच्छा
इलाज x नाइलाज
इहलोक x परलोक
उघडे x बंद
उच x नीच
उजेड x काळोख
उदासवाणा x उल्हासित
उभे x आडवे
उमेद x मरगळ
उंच x बुटका
उच्च x नीच
उतरणे x चढणे
उत्तम x क्षुद्र
उत्कर्ष x अपकर्ष, अधोगती
उचित x अनुचित
उदघाटन x समारोप
उदास x प्रसन्न
उदार x अनुदार, कृपण
उधार x रोख
उधळ्या x कंजूष, काटकसरी
उपकार x अपकार
उपदेश x बदसल्ला
उपयोगी x निरुपयोगी
उपाय x निरुपाय
उलट x सुलट
ऊन x सावली
उगवणे x मावळणे
उशिरा x लवकर
उत्तेजन x विरोध
उत्साह x निरुत्साह
उद्धट x नम्र
उदार x कंजूष
उन्नती x अवनती
एकदा x अनेकदा
ऐटदार x केविलवाणा
ऐच्छिक x अनैच्छिक, अपरिहार्य
कर्कश x संजुल
कडक x नरम
कळस x पाया
कच्चा x पक्का
कबूल x नाकबूल
कडू x गोड
कर्णमधुर x कर्णकटू
कठीण x सोपे
कल्याण x अकल्याण
कष्टाळू x कामचोर
कंटाळा x उत्साह
काळा x पांढरा
काळोख x प्रकाश, उजेड
कायदेशीर x बेकायदेशीर
कौतुक x निंदा
क्रूर x दयाळू
कोरडा x ओला
कोवळा x जून, निबर
किमान x कमाल
कीव x राग
कृतज्ञ x कृतघ्न
कृत्रिम x नैसर्गिक, स्वाभाविक
कृश x स्थूल
कृपा x अवकृपा
कीर्ती x अपकीर्ती
खरे x खोटे
खंडन x मंडन
खात्री x शंका
खाली x वर
खादाड x मिताहारी
खुळा x शाहाणा
खूप x कमी
खरेदी x विक्री
खोल x उथळ
गरम x थंड
गमन x आगमन
गढूळ x स्वच्छ
गंभीर x अवखळ, पोरकट
गद्य x पद्य
गाव x शहर
गारवा x उष्मा
ग्राहक x विक्रेता
ग्रामीण x शहरी
ग्राह्य x त्याज्य
गुरु x शिष्य
गुण x अवगुण
गुप्त x उगड
गुळगुळीत x खरखरीत, खडबडीत
गुणी x अवगुणी
गुणगान x निदा
गोड x कडू
गोरा x काळा
गौण x मुख्य
फसवी x स्पष्ट
फायदा x तोटा
फार x कमी
फुलणे x कोमेजणे
फुकट x विकत
फिकट x गडद
बहुमान x अपमान
बरोबर x चूक
बलाढ्य x कमजोर
बसणे x उठणे
बंद x उघडा
बंधन x मुक्तता
बंडाळी x सुव्यवस्था
बाल x वृद्ध
बाहेर x आत
बिघात x दुरुस्ती
बुद्धिमान x निर्बुद्ध
बुद्धिमान x ढ
बेसावध x सावध
बेसूर x सुरेल
भडक x सौम्य
भरती x ओहोटी
भरभर x सावकाश
भले x बुरे
भक्कम x कमकुवत
भय x अभय
भयंकर x सौम्य
भयभीत x निर्भय
भव्य x चिमुकले
भसाडा x मंजुळ
भरती x आहोटी
भान x बेभाम
भारतीय x अभारतीय
भाग्यवंत x दुर्भागी
भांडण x सलोखा
भिकारी x सावकार
भूक x तहान
भूषण x दूषण
महान x क्षुद्र
मधुर x कडवट
महाल x झोपडी
मऊ x टणक
मंद x प्रखर
मंजुळ x कर्कश
माता x पिता
माथा x पायथा
माय x बाप
मालक x नोकर
मान x अपमान
माया x द्वेष
माघारा x सामोरा
मान्य x अमान्य
म्हातारा x तरुण
मिटलेले x उघडलेले
मित्र x शत्रू
मैत्री x दुश्मनी
मोठा x लहान
मोकळे x बंदिस्त
मौन x बडबड
मृत्यू x जीवन
मृदू x कठीण
मुका x बोलका
मूर्ख x शहाणा
यशस्वी x अयशस्वी
यश x अपयश
याचक x दाता
येईल x जाईल
योग्य x अयोग्य
रक्षक x मारक
रुडू x हसू
राग x लोभ
राजा x रंक
रुचकर x बेचव
रूपवान x कुरूप
रेखीव x खडबडीत
रिकामे x भरलेले
रोड x सुदृढ
लहानपण x मोठेपण
लक्ष x दुलर्क्ष
लवकर x उशिरा
लबाड x भोळा
लबाडी x प्रामाणिकपणा
लय x प्रारंभ
लक्ष x दुर्लक्ष
लाडके x नावडते
लांब x जवळ
लांबी x रुंदी
लेचापेचा x भक्कम
लोभी x निर्लोभी
वाकडे x सरळ
वापर x गैरवापर
वृद्ध x तरुण
विचार x अविचार
विद्यार्थी x शिक्षक
विश्वास x अविश्वास
विलंब x त्वरा
विशेष x सामान्य
विद्वान x अडाणी
विष x अमृत
विरोध x पाठिंबा
विसरणे x आठवणे
वेडा x शहाणा
वेगात x हळूहळू
व्यवस्थित x अव्यवस्थित
शत्रू x मित्र
शहर x खेडे
शकून x अपशकून
शाप x वर
शंका x खात्री
शेवट x सुरवात
श्वास x निःश्वास
शिखर x पायथा
शिकारी x सावज
शिस्त x बेशिस्त
शिक्षा x शाबाशकी
शीतल x उष्ण
शीत x अशीत
शक्य x अशक्य
शेंडा x बुडखा
शुद्ध x अशुद्ध
शूर x भित्रा
श्रीमंत x गरीब
श्रेष्ठ x कनिष्ठ
सकाळ x संध्याकाळ
सज्जन x दुर्जन
सदाचार x दुराचार
सभ्य x असभ्य
सतर्क x बेसावध
सतेज x निस्तेज
समाधान x असमाधान
सरस x निरस
समान x असमान
समृद्धी x दारिद्र्य
सत्य x असत्य
सरळ x वाकडा
संवाद x विसंवाद
स्वच्छ x घाणेरडा
स्वतंत्र x परतंत्र
स्वस्थ x बेचैन
स्वहित x परमार्थ
स्वदेश x परदेश
सुभाषित x कुभाषित
सूर्योदय x सूर्यास्त
सोपे x कठीण
सोय x गैरसोय
सौजन्य x उद्धटपणा
सेवक x मालक
हळू x जलद
हसणे x रडणे
हलके x जड
हजर x गैरहजर
हसतमुख x रडततोंड
हार x जीत
हिम्मत x भय
हिंसक x अहिंसक
हिरमुसलेला x उत्साही
हित x अहित
हिशेबी x बेहिशेबी
हीन x दर्जेदार
हुशार x मठ्ठ
होकार x नकार
क्षमा x शिक्षा
ज्ञान x अज्ञान
४. शब्दातील अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द बनवणे
✓अक्षरमोती - अक्षर, मोती , मोर, तीर, अक्ष
✓कुमारभारती - कुमार, मार, भारती, भार, तीर, रती
✓ जवळपास - जवळ, पास, वळ, पाव, पाज
✓वातावरण - तारण, वावर, वार, वरण, ताण, वाव
✓शब्दसंपत्ती - शब्द, संपत्ती, संप
✓ तुकाराम - राम, मरा, काम, मका