Sunday, March 14, 2021

वाक्प्रचार

                  मराठी वाक्प्रचार 

       ✓ काही शब्दसमूहांचा भाषेत वापर करताना त्यांचा नेहमीचा अर्थ न राहता, त्यांना वेगळाच अर्थ प्राप्त होतो, त्यांना वाक्प्रचार म्हणतात.


✓ उकळी फुटणे - खूप आनंद होणे.

✓उखळ पांढरे होणे - खूप द्रव्य मिळणे.

✓उखाळ्या पाखाळ्या काढणे - एकमेकांचे उणेदुणे काढणे.

✓उघडा पडणे - खरे स्वरूप प्रकट होणे.

✓उचल खाणे - एखादी गोष्ट करण्याची अनिवार इच्छा होणे.

✓उचल बांगडी करणे - जबरदस्तीने हलविणे.

✓उच्चाटन करणे - घालवून देणे, नष्ट करणे.

✓उच्छाद मांडणे - उपद्रव देणे.

✓उचंबळून येणे - भावना तीव्र होणे.

✓उजाड माळरान - ओसाड जमीन.

✓उजेड पडणे - मोठे कृत्य करणे.

✓उल्लेख करणे - उच्चार करणे, सांगणे.

✓उंटावरून शेळ्या हाकणे - मनापासून काम न करणे.

✓उठून दिसणे - शोभून दिसणे, नजरेत भरणे.

✓उत्तेजन देणे - पाठिंबा देणे.

✓उतराई होणे - उपकार फेडणे.

✓उत्तीर्ण होणे - यशस्वी होणे.

✓उत्कंठा असणे - उत्सुक असणे.

✓उदक सोडणे - त्याग करणे.

✓उदरी शनी येणे - संपत्तीचा लाभ होणे.

✓उदास वाटणे - फार खिन्न वाटणे.

✓उद्धार करणे - प्रगती करणे.

✓उधाण येणे - चेव येणे, ओसंडून वाहणे, भरती येणे.

✓उध्वस्त होणे - नाश पावणे.

✓उधळून देणे - पसरून देणे.

✓उन्मळून पडणे - मुळासकट कोसळून पडणे.

✓उन्हाची लाही फुटणे (उन्हाचा जाळ पेटणे) - अतिशय ✓कडक ऊन पडणे.

✓उद्योगात चूर होणे - कामात गुंग असणे, मग्न असणे.

✓उतू जाणे - कल्पनेपेक्षाही अधिक असणे.

✓उपासना करणे - पूजा करणे, आराधना करणे.

✓उपसर्ग होणे - त्रास होणे.

✓उपपादन करणे - बाजू मांडणे.

✓उपद्व्याप करणे - खूप त्रास सहन करणे.

✓उपदेशाचा डोस पाजणे - उपदेश करणे.

✓उंबरठा चढणे - प्रवेश करणे.

✓उबगणे - कंटाळा येणे.

✓उमाळा येणे - तीव्र इच्छा होणे.

✓उमज पडणे - समजणे.

✓उभ्या उभ्या चक्कर टाकणे - सहज जाऊन पाहून येणे.

✓उरकून घेणे - पार पाडणे.

✓उराशी बाळगणे - अंतःकरणात जतन करून ठेवणे.

✓उरापोटावर बाळगणे - सांभाळ करणे.

✓उरस्फोड करणे - काळीज फाटेपर्यंत कष्ट करणे.

✓उरी फुटणे - अतिशय दुःख होणे.

✓उरकून घेणे - आटोपणे, संपवणे.

✓उलगडा होणे - अगदी स्पष्टपणे समजणे.

✓उलटी अंबारी हाती येणे - भीक मागण्याची पाळी येणे.

✓उष्ट्या हाताने कावळा न हाकणे - कधी कोणाला काहीही मदत न करणे.

✓उसळी घेणे - जोराने वर येणे.

✓उसासा सोडणे - विश्वास सोडणे.

✓ऊत येणे - अतिरेक होणे, चेव येणे.

✓ऊन खाली येणे - सायंकाळ होणे.

✓ऊर दडपणे - अतिशय भीती वाटणे.

✓ऊर भरून येणे - भावना दाटून येणे.

✓ऊर बडवून घेणे - आक्रोश करणे.

✓ऊर फाटणे - अतिशय दुःख होणे.

✓ऊस मळे फुलणे - ऊसमळे चांगले वाढीस लागणे.

✓ऊहापोह करणे - चर्चा करणे (उहापोह करणे).

✓ सर्वस्व पणाला लावणे : सर्व शक्य मार्गांचा अवलंब करणे

-- शेतकरी शेतामध्ये पीक घेताना सर्वस्व पणाला लावतात.

√ साखर पेरणे : गोड गोड बोलून आपलेसे करणे

-- रमेश शाळेत सर्वांशी साखर पेरून राहतो.

✓ सामोरे जाणे : निधड्या छातीने संकटास तोंड देणे

✓ साक्षर होणे : लिहिता-वाचता येणे

✓ साक्षात्कार होणे : आत्मिक ज्ञान प्राप्त होणे खरेखुरे स्वरूप कळणे

✓ हस्तगत करणे : ताब्यात घेणे

✓ सोन्याचे दिवस येणे : अतिशय चांगले दिवस येणे

✓ सूतोवाच करणे : पुढे घडणार्‍या गोष्टींची प्रस्तावना करणे

✓ संधान बांधने : जवळीक निर्माण करणे

✓ संभ्रमात पडणे : गोंधळात पाडणे

✓ स्वप्न भंगणे : मनातील विचार कृतीत न येणे

 स्वर्ग दोन बोटे उरणे : आनंदाने गर्वाने अतिशय फुगून जाणे

 हट्टाला पेटणे : मुळीच हट्ट न सोडणे

✓ हमरीतुमरीवर येणे : जोराने भांडू लागणे

✓ हरभऱ्याच्या झाडावर चढणे : खोटी स्तुती करून मोठेपणा देणे


   ✓  अंग चोरणे- फारच थोडे काम करणे.

   ✓ अंगाची लाही लाही होणे-अतिशय संताप येणे.

   ✓ अंगात वीज संचारणे- अचानक बळ येणे.

   ✓ अंगवळणी पडणे- सवय होणे.

    उर भरून येणे- गदगदून येणे.

    कपाळ फुटणे- दुर्दैव ओढवणे.

    ✓ कपाळमोक्ष होणे- मृत्यू येणे, अचानक येणाऱ्या संकटाने उध्वस्त होणे.

  ✓  कपाळाला हात लावणे- हताश होणे, निराश होणे.

   ✓ काढता पाय घेणे- विरोधी परिस्थिती पाहून निघून जाणे .

   ✓ कानउघाडणी करणे- चुकीबद्दल कडक शब्दात बोलणे.

   ✓ कान उपटणे- कडक शब्दात समजावणे.

   ✓ कान टोचणे- खरमरीत शब्दात चूक लक्षात आणून देणे.

 ✓   कान निवणे- ऐकुन समाधान करणे.

   ✓ कान फुंकणे- चुगली/ चहाडी करणे.

   ✓ कानाने हलका असणे- कशावरही पटकन विश्वास ठेवणे.

   ✓ कानामागे टाकणे- दुर्लक्ष करणे.

  ✓  कानाला खडा लावणे- एखाद्या गोष्टीच्या अनुभवावरून ती ठरवून टाळणे.

 ✓   कानावर हात ठेवणे- नाकबूल करणे.

  ✓  कानीकपाळी ओरडणे- एक सारखे बजावून सांगणे.

 ✓   कानावर घालणे- लक्षात आणून देणे.

  ✓  कानोसा घेणे- अंदाज किंवा चाहूल घेणे.

  ✓  केसाने गळा कापणे- घात करणे.

  ✓  कंठ दाटून येणे- गहिवरून येणे.

  ✓  कंठस्नान घालने- शिरच्छेद करणे.

 ✓   कंठाशी प्राण येणे- खूप कासावीस होणे.

✓    कंबर कसणे- जिद्दीने तयार होणे.

  ✓  कंबर खचणे- धीर सुटणे.

  ✓  खांद्याला खांदा भिडवने- सहकार्य व एकजुटीने काम करणे.

  ✓  गळा काढणे- मोठ्याने रडणे.

  ✓  गळा गुंतणे- अडचणीत सापडणे.

  ✓  गळ्यात गळा घालणे- खूप मैत्री करणे.

  ✓  गळ्यातला ताईत होणे- अत्यंत आवडता होणे.

  ✓  गळ्यापर्यंत बुडणे- कर्जबाजारी होणे, डबघाईला येणे.

  ✓  चेहरा खुलने- आनंदित होणे.

   ✓ चेहरा पडणे- लाज वाटणे, खजील होणे.

  ✓  छाती दडपणे- घाबरून जाणे.

   ✓ जिभेला हाड नसणे- वाटेल ते बोलणे.

  ✓  जीव की प्राण असणे- अत्यंत प्रिय असणे. 

  ✓  डोक्यावर खापर फोडणे- निर्दोष माणसावर दोष टाकणे.

   ✓ डोक्यावर बसवणे- फाजील लाड करणे.

  ✓  डोळा असणे- नजर/पाळत ठेवणे.

  ✓  डोळा लागणे- झोप येणे.

   ✓ डोळे उघडणे-अनुभवाने सावध होणे.

 ✓   डोळेझाक करणे- दुर्लक्ष करणे.

  ✓  डोळे निवणे- समाधान होणे.

  ✓  डोळे पांढरे होणे- धक्कादायक प्रसंग निर्माण होणे.

 ✓   डोळ्यात अंजन घालणे- चूक स्पष्टपणे लक्षात आणून देणे.

  ✓  डोळ्यात खुपणे- मत्सर करणे.

  ✓  डोळ्यात धूळ फेकणे- खोटेनाटे सांगून फसवणे.

  ✓  डोळ्याला डोळा न लागणे- झोप न येणे.

 ✓   डोळ्याचे पारणे फिटणे- समाधान होणे किंवा पाहून आनंदित होणे.

  ✓  डोळे विस्फारणे- आश्चर्याने पाहणे.

  ✓  डोळ्यातून थेंब न काढणे- मोठा आघात होऊनही न रडणे.

  ✓  तळपायाची आग मस्तकात जाणे- अतिशय संतापने.

  ✓  तोंड काळे करणे- कायमचे निघून जाणे.

 ✓   तोंडघशी पडणे- विश्वास घात होणे / अडचणीत येणे.

  ✓  तोंडचे पाणी पळणे- अतिशय घाबरणे.

  ✓  तोंड देणे- सामना करणे

 ✓   तोंड फिरवणे- नाराजी व्यक्त करणे.

✓    तोंड भरून बोलणे- मनाचे समाधान होईपर्यंत बोलणे.

 ✓   तोंड वेंगाडणे- याचना करणे.

  ✓  तोंड सांभाळून बोलणे- जपून बोलणे.

 ✓   तोंड सुख घेणे- दोष देताना वाटेल तसे बोलणे.

 ✓   तोंडाची वाफ दवडणे- वायफळ बडबड करणे.

  ✓  तोंडात बोट घालणे- आश्चर्यचकित होणे.

  ✓  तोंडात शेण घालणे- पराकोटीची निंदा करणे.

 ✓   तोंडाला कुलूप घालणे- गप्प बसणे.

 ✓   तोंडाला तोंड देणे- भांडणे.

  ✓  तोंडाला पाणी सुटणे- हाव निर्माण होणे.

 ✓   दात ओठ खाणे- चीड व्यक्त करणे.

 ✓   दात धरणे- सूड घेण्याची भावना बाळगणे.

 ✓   दात विचकणे- निर्लज्जपणे असणे.

 ✓   दाताच्या कण्या करणे- वारंवार विनंती करणे.

  ✓  दाती तृण धरणे- शरण जाणे.

  ✓  नजर चुकवणे- न दिसेल अशी हालचाल करणे. 

 ✓   नवल वाटणे- आश्चर्य वाटणे, चकित होणे.

   ✓ नाक उडवणे- थट्टा, उपास करणे