जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालय, विडूळ ता . उमरखेड जि. यवतमाळ
ऑनलाईन परीक्षा
वर्ग - 10 वा, विषय - गणित भाग - I , गुण - 40, वेळ - 2 तास
दिनांक - 06 / 04 / 2021 , वेळ - 12 : 00 ते 2 : 15
-----------------------------------------------------------------
प्र. 1 (A) पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत . त्यांपैकी अचूक उत्तराचा पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा : 04
i. x - y=10 आणि x + y=70 या समीकरणांची उकल -------- आहे.
A) (40,30) B) (30,40)
C) (10,60) D) (50,20)
ii. x² – kx + 27 = 0 या वर्गसमीकरणाचे एक मूळ 3 असेल तर k ची किंमत खालीलपैकी कोणती ?
A) 10 B) 12
C) -12 D) 16
iii. नैसर्गिक संख्यांच्या प्रमाणे विशिष्ट क्रमाने माांडलेल्या संख्यांच्या समूहाला........
म्हणतात.
(A) अनुक्रमणिका (B) संख्या
(C) ओळ (D) क्रमिका
iv. पत्यांच्या कॅट मधून एक पत्ता यादृच्छिक पध्दतीने निवडायचा आहे. या प्रयोगात किती शक्यता आहेत?
A) 4 B) 1 C) 26 D) 52
प्र. 1 (B) पुढील उपप्रश्न सोडवा : 04
i. जर x+2y=5 आणि 2x+y=7 असल्यास x+y ची किंमत काढा.
ii. जर b² – 4ac > 0 व b² – 4ac < 0 असेल तर या प्रत्येक बाबतीत वर्सगमीकरणाच्या मुळाचेस्वरूप लिहा.
iii. एका क्रमिकेत tn=2n-5 आहे तर तिची पहिली दोन पदे काढा.
iv. खालील प्रयोगासाठी घटना संच स्वरूपात लिहा.
एक फासा टाकला असता वरच्या पृष्ठभागावर सम संख्या मिळणे.
प्र. 2 A. पुढीलपैकी कोणत्याही दोन कृती पूर्ण करून लिहा. 04
i)
ii)
iii)
प्र. 2 B . पुढील कोणतेही चार उपप्रश्न सोडवा. 08
i. (3, −2) हा बिंदू 5 𝑚 − 3 𝑛 = −21 या समीकरणाच्या आलेखावर असेल का ते
सकारण लिहा .
ii. x² + 8x – 48= 0 या वर्गसमीकरणासाठी विवेचकाची किंमत काढा.
iii. जर a=4 आणि d=0 या अंकगणिती श्रेढीची पहीली पाच पदे काढा.
iv. एका खोक्यात 1 ते 30 संख्या लिहलेली 30 कार्डे आहेत. त्यातून कोणतेही एक कार्ड यादृच्छिक पद्धतीने काढले असता, ‘कार्डावरील संख्या 5 च्या पटीत असण्याची’ संभाव्यता
काढा.
v. समीकरण a + 2b = 7 मध्ये b = 4 असताना a ची किंमत काढा.
प्र. 3 A. खालीलपैकी कोणतीही एक कृती सोडवा. 03
i.
ii.
प्र. 3. B . पुढील कोणतेही दोन उपप्रश्न सोडवा. 06
i. अजय हा विजय पेक्षा 7 वर्षांनी लहान आहे. त्यांच्या वयाची बेरीज 25 वर्ष आहे. तर
त्या दोघांची वये काढा ?
ii. खालील वर्गसमीकरण सोडवा.
√3 x² + √𝟐 x – 2√𝟑 =0
iii. एक नाणे व एक फासा एकाच वेळी फेकले असता, पुढील घटनांची संभाव्यता काढा.
i) घटना A : काटा व सम संख्या मिळणे.
ii) घटना B : छापा व विषम संख्या मिळणे.
iv. मेरीला दरमहा 15000 रु. पगाराची नोकरी मिळाली,जर तिला दरमहा 100 रु. पगारवाढ मिळत असेल तर 20 महिन्यांनंतर मेरीचा पगार किती होईल?
प्र. 4. खालीलपैकी कोणतेही दोन उपप्रश्न सोडवा. 08
i. एका वर्गसमीकरणाच्या दोन मुळांची बेरीज 5 आणि त्यांच्या घनांची बेरीज 35 आहे तर
ते वर्गसमीकरण कोणते ?
ii. पुढील एकसामायिक समीकरण आलेख पद्धतीने सोडवा.
𝑥 + 𝑦 = 5; 3 𝑥 - 𝑦 = 11
iii. एका साधारण वर्षात 53 रविवार येण्याची संभाव्यता काढा.
प्र. 5. पुढीलपैकी कोणताही एक उपप्रश्न सोडवा. 03
i. मी 75 ही सिंख्या मनात धरली,
त्या संख्येच्या दोन्ही अंकातील संबंध दर्शवणारी अट लिहा. मूळ संख्या आणि अंकांची अदलाबदल करून येणा-या संख्येतील संबंध दर्शवणारी अट लिहा.
ii. एका पिशवीत आठ लाल व काही निळे चेंडू आहेत. एक चेंडू यादृच्छिक पद्धतीने काढला, तर लाल चेंडू आणि निळा चेंडू यांच्या संभाव्यतेचे गुणोत्तर 2 : 5 आहे, तर निळ्या चेंडूची संभाव्यता काढा.
--------------------------------------------------------------