विरामचिन्हे ओळखणे
✓ इ १० वी बोर्ड परीक्षेत या घटकावर १ गुणाचा प्रश्न विचारला जातो.
✓विरामचिन्हे म्हणजे काय?
आपण संभाषण करताना किंवा बोलताना मध्ये मध्ये थांबतो, म्हणजेच विराम घेतो आणि लिहिताना मात्र तो विराम चिन्हांनी दर्शविला जातो. अशा चिन्हांना विरामचिन्हे असे म्हणतात.
✓विरामचिन्हांचे प्रकार
✓मराठी व्याकरणामध्ये विरामचिन्हांचे पुढीलप्रमाणे एकूण दहा प्रकार आहेत.
१. पूर्णविराम ( . )
✓या चिन्हाचा उपयोग वाक्य पूर्ण झाले की करतात.
उदा.
✓ सुरेश पत्र लिहीत आहे.
✓शब्दांचा संक्षेप दाखविण्यासाठी अक्षरांपूढे
उदा.
✓मा.क.(मोहनदास करमचंद)
२. स्वल्पविराम ( , )
✓एकच जातीचे अनेक शब्द आले असता हे चिन्ह वापरले जाते.
उदा.
✓माझ्याकडे लाल, निळा, काळा, हिरवा या सर्व रंगाचे पेन आहेत.
✓संबोधन (हाक मारणे) दर्शवितांना.
उदा.
✓ रमेश, इकडे ये.
३. अपूर्णविराम / उपपुर्णविराम ( : )
✓ हे अपूर्णविरामाचे चिन्ह आहे.
✓वाक्याच्या शेवटी तपशील घावयाचा असल्यास.
उदा.
✓ पुढील क्रमांकाचे विद्यार्थी उत्तीर्ण झाले: 1,8,9,11,19.
४. प्रश्नचिन्ह ( ? )
✓प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी हे चिन्ह वापरले
जाते.
उदा.
✓ हेमंत तूला दहावीच्या परीक्षेत किती गुण मिळाले ?
५. अवतरणचिन्ह-
१. एकेरी अवतरण चिन्ह ( ' ..........' )
२. दुहेरी अवतरण चिन्ह ( " .............." )
✓एकेरी अवतरणचिन्ह एखाधा शब्दावर जोर लावायचा असल्यास.
उदा.
✓ मराठी आणि हिंदी भाषेची लिपी ‘देवनागरी’ आहे.
✓दुहेरी अवतरणचिन्ह बोलणार्याला तोंडाचे शब्द दाखवण्याकरिता.
उदा.
✓ अमानत म्हणाला, " मी गावी जाणार आहे. "
✓दुसर्याचे मत अप्रत्येक्षपणे सांगतांना.
६. अर्धविराम ( ; )
✓हे अर्धविरामाचे चिन्ह आहे.
✓दोन छोटी वाक्य उभयान्वयी अव्ययाने जोडताना
उदा.
कृष्णा गरिब आहे ; परंतु तो मनाने खूप श्रीमंत आहे.
७. उद्गारवाचक चिन्ह ( ! )
✓हे उद्गारवाचक चिन्ह आहे.
✓मनातील उत्कट भावना व्यक्त करताना ती दाखविणार्या शब्दाच्या शेवटी.
उदा.
✓बापरे! केवडा मोठा साप!
✓आहाहा! किती सुरेख देखावा
८. संयोगचिन्ह ( - )
✓ हे संयोगचिन्ह आहे.
✓दोन शब्द जोडतांना.
✓ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास,
उदा.
✓ प्रेम-विवाह
✓ क्रिडा-संकुल
९. अपसरणचिन्ह / स्पष्टीकरण चिन्ह / डॅश ( – )
हे अपसरणचिन्ह आहे.
✓बोलताना विचारमाला तुटल्यास.✓स्पष्टीकरण लावयाचे असल्यास.