जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालय, विडूळ ता . उमरखेड जि. यवतमाळ
ऑनलाईन परीक्षा
वर्ग - 10 वा , विषय :- भूगोल, गुण - 40, वेळ - 2 तास
दिनांक - 13 / 04 / 2021 , वेळ - 12 : 00 ते 2 : 00
--------------------------------------------------------------------------------------
प्र. १. (अ) . दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यााय निवडून विधाने पुन्हा लिहा : 04
1. दक्षिण अमेरिका खंडातील हे दोन देश ब्राझीलच्या सीमेलगत नाहीत.
i) चिली-इक्वेडोर ii) अर्जेंटिना-बोलिव्हिया iii) कोलंबिया-फ्रेंच गियानाiv) सुरीनाम-उरुग्वे
2. दोन्ही देशांतील राजवट प्रकारची आहे.
i) लष्करी ii) साम्यवादी iii) प्रजासत्ताक iv) अध्यक्षीय
3. ब्राझीलमधील सदाहरित वर्षावनांना..असे संबोधतात.
i)भूमध्य सागरी वने(ii)जगाची फुफ्फुसे(iii)जगाचा कॉफीपॉट(iv)रोका
4. ॲमेझॉन नदीचे खोरे मुख्यतः.
i)अवर्षणग्रस्त आहे.ii)दलदलीचे आहे.iii)मानवी वस्तीस प्रतिकूल आहे.iv)सुपीक आहे.
प्र. 2. योग्य जोड्या जुळवा : 04
'अ' गट 'ब' गट
(1)मॅनॉस i) कमी पावसाचा प्रदेश
(2) राजस्थान ii) केंद्रीत वस्ती
(3) ब्राझील उच्चभूमी. iii) बंगालचा वाघ
(4)उत्तर भारतीय मैदानी प्रदेश iv) गवताळ प्रदेशातील प्राणी v) दलदलीचा प्रदेश
vi) तापमान कक्षेत फारसा फरक नाही
प्र. 3. खालील विधाने चूक की बरोबर ते लिहा.: ( को. 4 ) 04
1) ब्राझील हा देश प्रामुख्याने दक्षिण गोलार्धात आहे.
2) भारतापेक्षा ब्राझीलमध्ये साक्षरतेचे प्रमाण अधिक आहे.
3) ब्राझीलमधील लोक ईशान्य भागापेक्षा आग्नेय भागात राहणे जास्त पसंत करतात.
4) ब्राझीलच्या पश्चिम भागात दाट लोकवस्ती आहे.
5) भारताच्या मध्यातून मकरवृत्त गेले आहे.
प्र. 4. अ. तुम्हाला पुरवलेल्या भारताच्या नकाशा आराखड्यात पुढील घटक दाखवा, तसेच त्यांची नावे द्या व चिन्हांची सूची तयार करा : ( को. 4 ) 04
1) सिक्कीम2) नर्मदा नदी3) शीत वाळवंट4) एकशिंगी गेंडा5) दक्षिण भारतातील लोकसंख्येची जास्त घनता असलेले राज्य6) मुंबई प्रमुख बंदर
प्र. 4. (आ) खालील ब्राझीलच्या नकाशाचे वाचन करून त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. (को. 4) 04
प्रश्न :
1) अमेझॉन नदी खोऱ्याच्या उंचीची कक्षा सांगा.
2) अॅमेझॉनचे खोरे कोणत्या दोन उच्चभूमींच्या दरम्यान आहे?
3) पिको दी नेब्लीना पर्वत शिखराची उंची किती आहे.
4) कटिंगा क्षेत्र ब्राझीलच्या कोणत्या दिशेस आहे.
5) ब्राझीलच्या दक्षिणेस कोणता गवताळ प्रदेश आहे.
प्र.5. पुढील विधानांची भौगोलिक कारणे लिहा. ( को .2 ) 06
1) पाण्याची उपलब्धता हा लोकवस्तीस चालना देणारा प्रमुख घटक आहे.
2. भारतातील वन्य प्राण्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे.
3. आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी सागरी मार्गावर अवलंबून राहावे लागते.
4. उत्तर भारतात अन्य राज्यापेक्षा दिल्ली आणि चंदीगड इथे नागरीकरण जास्त झाले आहे.
प्र.6. अ. खालील सांख्यिकीय माहितीच्या आधारे साधा स्तंभलेख तयार करा व खालील प्रश्नांची उत्तरे लिहा : 06
1) 2008 ला भारताची निर्यात किती होती ?
2) भारताची सर्वाधिक निर्यात कोणत्या वर्षी होती ?
3) 2009 ते 2011 या कालावधीत भारताची निर्यातीत किती दशलक्षाने वाढ झाली ?