Thursday, April 1, 2021

हेल्थकेअर

 

उद्या दि. 03/04/21 रोजी होणारा पेपर - मराठी, वेळ - 12 : 00 ते 3 : 30

जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालय, विडूळ

 ता . उमरखेड जि. यवतमाळ

 ऑनलाईन परीक्षा

वर्ग - 10 वा , विषय :- हेल्थकेअर,  गुण - 80, वेळ - 3 तास

दिनांक - 02 / 04 / 2021 , वेळ - 12 : 00 ते 3 : 00
-----------------------------------------------------------------


प्र. 1. (अ) योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा.     05


i) हॉस्पिटल हा शब्द ............ या भाषेचा अपभ्रंश आहे.


अ. ग्रीक
ब. फ्रेंच
क. लॅटिन


ii) प्राथमिक आरोग्य केंद्रात ........... खाटा असतात. 

अ) 2 ते 3 
ब) 6 ते 10 
क) 4 ते 5 


iiii. मानवी शरीराचे साधारणतः तापमान ........ असते.

अ) 98.6⁰F
ब)  98.6⁰F
क) 101⁰F


iv) फ्लेक्शन म्हणजे ............. होय.

अ) दुमडणे
ब) ताठ करणे 
क)  अभीवर्तन

v) सरकारी रूग्णवाहिकेचा नंबर ............. आहे.

अ) 101
ब) 108
क) 100


ब) जोड्या लावा:      05


      'अ' गट                        'ब' गट

i. ओ.पी.डी                  अ) शरिर बांधनी 
ii. सामान्य रक्तदाब         ब) शरिराला प्राथमिक आधार देणे 
iii. सतत होणारी वांती  क) 120/80 mm of hHg
iv.  प्रथिने                       ड) बाह्य रूग्ण विभाग 
v. अस्थिसंस्था                  इ) ओं.आर.एस.
                                          

क.  खालील विधाने चूक की बरोबर ते लिहा. 05


i. ग्रामीण रूग्णालय हे प्रामुख्याने ग्रामीण भागातच असते.


ii.  रूग्णाच्या बिछाना निटनेटका व स्वच्छ असावा.


iii. प्रथमोपचार पेटीमध्ये कापसाचे बोळे नसतात.


iv. सोडियमच्या कमतरतेमुळे हायपोनायट्रेमिया हा आजार होतो.


v. आहार प्राशन केल्यानंतर रूग्णास लगेच झोपण्यास सांगावे.






ड. प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.        05


i. रूग्णालय म्हणजे काय ?


ii. संतुलित आहार म्हणजे काय ?


iii. पुनर्वसन सेवा कोणास दिली जाते  ?


iv. प्रतिजैविक मला कशासाठी वापरतात ?


v. चाकाची खूर्चिचा वापर कशासाठी करतात ?




प्र. 2 . थोडक्यात उत्तरे लिहा    ( को. 4 )          12


i. सरकारी रुग्णालय व खाजगी रुग्णालय यांमधील फरक स्पष्ट करा.


ii. आंथरूणाचे प्रकार लिहा


iii. रोग परिस्थिती विज्ञानाचा त्रिकोण लिहा


iv. शरिराच्या सामान्य हालचाली कोणत्या ? ते लिहा.


v. पाठदुखीवर काय प्रथमोपचार करू शकतो ? ते लिहा.

vi. रुग्णांच्या तक्रारीस कसे सामोरे जाल ?




प्र. 3 . खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा    ( को. 4 ) 12



i. रुग्णालयातील पाच विविध विभागांची नावे लिहा.


ii. रुग्णालयात संगणकाचा वापर कशा प्रकारे करू शकतात ! ते लिहा.


iii. श्वसन संस्थेची सुबक आकृती‌ काढून नावे द्या.


iv. प्रथमोपचारचे उद्देश लिहा.


v. रुग्णालयात देण्यात येणा-या संतुलित आहाराचे प्रकार लिहा.

vi. जिवाणूंमुळे उद्भवणारे आजार कोणते ते लिहा.


प्र. 4. खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा.  ( को. 3 )         12


i. परिचारिका मदतनीसच्या अंगी कोणती गुणवत्ता हवी ?


ii. आदर्श जंतूनाशकाचे गुणधर्म लिहा .


iii. अन्नसेवा विभागाची भूमिका स्पष्ट करा.


iv.  प्रथमोपचारात अ. ब. क. म्हणजे काय ? स्पष्ट करा.


v. पर्यवेक्षकाचे कार्य थोडक्यात लिहा.


प्र. 5. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.   ( को. 3 ).      12


१. मुत्र संस्थेची सुबक आकृती‌ काढून नावे द्या.


२. चौकशी कर्मचाऱ्यांबद्दल थोडक्यात लिहा.


iii. भौतिक जंतुनाशक कोणकोणते ? ते थोडक्यात लिहा.

iv. ओ. आर. एस . बनविण्याची कृती लिहा.

v. थोडक्यात टिपा लिहा - प्रथिने.


प्र. 6.  खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा.  ( को. 2 ).   12


i. शरीराचे तापमान घेण्याची प्रक्रिया लिहा.


ii. सांधा म्हणजे काय ? त्यांचे प्रकार लिहा.


iii. भाजणे / जळणे यांचे वर्गीकरण करून त्यावरील प्रथमोपचाराबद्दल माहिती लिहा.

iv. जीवनसत्वाचे वर्गीकरण करा व त्याचे अन्नस्त्रोत लिहा.